उद्य़ोगमंत्री उदय सामंत लिडिंग फ्रॉम फ्रंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्य़ोगमंत्री उदय सामंत लिडिंग फ्रॉम फ्रंट
उद्य़ोगमंत्री उदय सामंत लिडिंग फ्रॉम फ्रंट

उद्य़ोगमंत्री उदय सामंत लिडिंग फ्रॉम फ्रंट

sakal_logo
By

बातमी क्र. १८ (उदय सामंत पुरवणीसाठी लेख)
(टीप- मुख्य पानवरील लेख)

(पुरवणीसाठी डोके- उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत अभिष्टचिंतन विशेष)

(पुरवणी संकलण.....राजेश शेळके)

------------------

फोटो ओळी
-rat२५p२९.jpg- रत्नागिरी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना उद्योगमंत्री उदय सामंत.
-rat२५p१७.jpg-KOP२२L७०८८० जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत. तसेच कृषींमंत्री दादा भुसे आदी.
-rat२५p१८.jpg-KOP२२L७०८८१ रत्नागिरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करताना मंत्री उदय सामंत
-rat२५p१९.jpg-KOP२२L७०८८२ मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीतील पहिलीच सभा विक्रमी घेऊन सामंत राजकीय चर्चेत राहिले.
-rat२५p२०.jpg- मंत्री असले तरी सर्वसामान्यांना आपलासा वाटनाणा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून दौऱ्यात ते जवळच्या व्यक्तींबरोबर कुठेही भोजनाचा आस्वाद घेतात.
-----

इंट्रो

राजकारणामध्ये लीड घेणारा म्हणजे प्रत्येकवेळी पुढाकार घेणारा नेता नेहमीच यशस्वी होतो. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या यशाचे गमक देखील हेच आहे. कोणतेही राजकीय पद असो वा मंत्रिपद, आपल्या मुत्सद्देगिरीने त्याला वेगळी उंची देण्याची ख्याती सामंत यांची आहेत. म्हणूनच जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ राजकीय नेते असले तरी २००४ पासून जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा उदय सामंत यांच्यावर आहे. पक्षीय जबाबदाऱ्यांमध्ये पुढे, मंत्रीमंडळाध्ये नेहमीच पुढे, विकास कामांच्या हातोटीत अग्रेसर, कार्यकर्त्यांची फळी उभा करण्यात पुढे, पक्ष बांधणीत पुढे. म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात राजकारणातील कामगिरीचे वर्णन ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’ असे केले जाते. कारण प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आघाडीवर राहात नेतृत्व केले आहे.

- राजेश शेळके, रत्नागिरी

उद्योगमंत्री उदय सामंत ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’

रत्नागिरी जिल्ह्याला मोठा राजकीय इतिहास आहे. मोरोपंत जोशी, बापूसाहेब परुळेकर, शामराव पेजे, कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव जड्यार, या मोठ्या राजकीय हस्तींचा समाजापुढे आदर्श राहिल, अशी राजकारणात त्यांनी कामगिरी केली. गेल्या वीस वर्षांमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांची राजकीय वाटचाल त्याच्या दिशेने सुरू आहे. उदय सामंत यांच्यात राजकीय नेतृत्व करणारे मुरब्बी, संयम्मी, निर्णय क्षमता, हजरजबाबीबणा, धाडस, असे अष्टपैलू गुण असल्याने ते जिल्ह्यात आणि कोकणातच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलावर आले. राजकारणात एकेक शिखर पादाक्रांत करत उदय सामंत यांनी कमी वयात मोठी राजकीय मजल मारली. त्यामुळे राज्यातील काही नामांकित राजकीय नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. राजकीय क्षेत्रातील चौथे पर्व त्यांनी पूर्ण केले, परंतु दुसऱ्या टर्ममध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या गळ्यात २०११-१२ मध्ये नगरविकास राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हा देखील राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज असताना महत्त्वाची पदे त्यांनी भुषविली. एक, दोन नव्हे तर ९ खात्यांची जबाबदारी त्यांनी लिलया पेलत रत्नागिरी मतदार संघ, जिल्हा आणि राज्यासाठी चांगला फायदा करून घेतला. अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी तेव्हा घेतले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अल्पावधीत ते मातोश्रीजवळ गेले. शिवसेनेत त्यांना उपनेतेपद, पक्षप्रवक्ते अशी पदे दिली. पुण्याचे संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आले होते. नवी जबाबदारी पार पडल्यानंतर अनेक संकटं शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारवर कोसळली; मात्र त्यातूनही मार्ग काढत सरकार खंबीरपणे काम करत होते. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी कोरोनाचे महाभयंकर संकट राज्यावर आले. त्याच्याशी सामना करण्यासाठी तत्कालीन सरकारमधील सर्व मंत्री कोरोनाशी सैनिक म्हणून लढले. उदय सामंत यांनी तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समन्वय साधून समर्थपणे जबाबदारीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत चालकाला सुट्टी देऊन स्वतःच्या गाडीचे सारथ्य त्यांनी केले. दिवसाला तीनशे ते चारशे किलोमीटरचा प्रवास करून सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अत्यंत धीराने सर्व परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. निसर्ग चक्रीवादळातही फटका बसलेल्या संपूर्ण किनारपट्टीचा दौरा केला. बाधितांना भेटी देऊन त्यांना धीर आणि तत्काळ मदत देण्याच्या दृष्टीने मोठी कामगिरी त्यांनी केली.
उच्च शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी पेलताना कोरोनामध्ये महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत त्यांनी सावधगिरीने निर्णय घेतले. म्हाडाचे अध्यक्ष असताना राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले. अनेकांना हक्काची घरे मिळवून दिली. उच्च शिक्षण विभागाचे कार्य किती मोठे आणि मोलाचे आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला पटवून दिले. त्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. वैद्यकीय महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय, कोकण सागरी संसाधनाच्या सुयोग्य वापरासाठी सागरी विद्यापीठ, युनानी वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, पैठण येथे संतपीठ स्थापना, अभियांत्रिकी महाविद्यालय (शासकीय), महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय, कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठ केंद्र आदी शैक्षणिक उपक्रम रत्नागिरीत राबविले. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाला वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले.
गेल्या ६ महिन्यात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाले. या राजकीय घडामोठीध्येही उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. नव्या मंत्रीमंडळात सामंत राज्याचे उद्योगमंत्री झाले. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत गेली १४ वर्षे बंद असलेली भारती शिपयार्डं कंपनी सुरू केली. रत्नागिरी एमआयडीसीतील वेरॉन इंडस्ट्रिज पुन्हा सुरू केली. तसेच देशभरात गाजणाऱ्या रिफायनरी प्रकल्प बारसूमध्ये व्हावा, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पासून जिल्ह्यातील तरूणांना मोठा रोजगार मिळणार आहे. तसेच जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. म्हणून स्थानिकांना विश्वासात घेऊन त्याबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
उपनेते आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना संघटनेला बळ देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेणे सुरू केले आहे. त्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिंदे सेना आता हळुहळु फोफावत चालली आहे. मतदारसंघासह जिल्ह्यात अनेक नेते असले तरी उदय सामंत यांनी व्यक्तीगत ताकद वाढवली आहे. प्रतिस्पर्धी प्रबळ नसल्याने गेल्या चार टर्मनंतर अकमेव नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यातूनच मोठ्या स्तरावर त्यानी लीलया पेललेली आव्हाने आणि आघाडीवर राहून केलेले नेतृत्व लक्षात घेतल्यावर लिडिंग फ्रॉम फ्रंट, असा नेता म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाहिले जात आहे.

चौकट-
मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा यशस्वी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ८०० कोटींच्या कामाचे उद्धाटने करून घेतली. नव्या पक्षाची विक्रमी सभा घेऊन विरोधकांना त्यांनी धक्काच दिला. मुख्यमंत्र्यांच्या त्या दौऱ्यामध्ये फक्त उदय सामंत यांचीच दोन आठवडे हवा होती. शहराचे सुशोभिकरण, स्वच्छता, रंगरंगोटी, रस्त्यांच्या दुरूस्तीने शहराचा कायापालटच करून दाखविला. विराट सभा घेऊन विरोधकांनाही त्यांनी धक्का दिला.