
खेड-तळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
rat२५४.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२५p२४.jpg-
७०९२५
खेड ः तळे हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेने बांधलेला वनराई बंधारा.
---
तळे हायस्कूलने बांधला वनराई बंधारा
खेड, ता. २६ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत तळे विभाग सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी तळे-कासारवाडीतील पऱ्यावर बंधारा बांधला.
राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख प्रशांत पंदेरे यांनी सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय हरित सेना उपक्रमातील विद्यार्थी, पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांच्या सहकार्याने पाणी आडवा-पाणी जिरवा मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
मुख्याध्यापक पोपट जगताप, ज्येष्ठ शिक्षक व राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख प्रशांत पंदेरे, महेश राणे, प्रशांत नाकती यांनी श्रमदान केले. संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद जंगम यांचे विशेष सहकार्य मिळाले. तळे ग्रामपंचायतीचे सरपंच शामराव मोरे, उपसरपंच भरत महाडीक, प्राचार्य बाबासाहेब कांबळे, मंगेश शिर्के, संतोष मोरे यांनी खाऊ वाटप व बंधाऱ्यासाठी साहित्य देऊन सहकार्य केले.