चिपळूण-आगवेकर विद्यालयात 30 ला ग्रंथालयाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-आगवेकर विद्यालयात 30 ला ग्रंथालयाचे उद्घाटन
चिपळूण-आगवेकर विद्यालयात 30 ला ग्रंथालयाचे उद्घाटन

चिपळूण-आगवेकर विद्यालयात 30 ला ग्रंथालयाचे उद्घाटन

sakal_logo
By

आगवेकर विद्यालयात ३० ला ग्रंथालयाचे उद्घाटन
चिपळूण, ता. २५ ः आपल्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीत राज्यातील १९ वी आदर्श शाळा असा नावलौकिक संपादन केलेली तालुक्यातील अलोरे येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालयाचा २६ ते ३० डिसेंबर दरम्यान शाळेच्या संकुलात सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ होणार आहे. महोत्सवात शुक्रवारी (ता. ३०) सकाळी श्रीसत्यनारायण पूजेनंतर १० ते १ वा. या वेळेत ग्रंथालय उद्घाटन होणार आहे. या वेळी वसंतराव लाड, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, संस्था उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संध्या देशपांडे, संस्था विश्वस्त धनंजय चितळे आदी उपस्थित राहणार आहेत. ग्रंथालय उद्घाटनानंतर शाळा संकुलात संजय बळीराम मोरे स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रम/चर्चागट अंतर्गत प्राथमिक व शिशुविहार विद्यार्थ्यांशी ज्येष्ठ कवी व समीक्षक अरुण इंगवले, ज्येष्ठ शाहीर राष्ट्रपाल सावंत साधतील. सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी केले आहे.