मुंबईत प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत प्रयोग
मुंबईत प्रयोग

मुंबईत प्रयोग

sakal_logo
By

rat२५२१.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

भालावलीतील बहुरंगी नमनाचा प्रयोग मुंबईत

राजापूर ः तालुक्यातील भालावलीच्या आई जाखादेवी कलामंचच्या बहुरंगी नमनाच्या शुभारंभाचा पहिला प्रयोग १ जानेवारीला होणार आहे. हा प्रयोग सायंकाळी सहा वाजता मुंबई मालाड येथील जिजामाता विद्यामंदिरमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ, शिवसैनिक काका कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
...

फोटो ओळी
-rat२५p२८.jpg-
७०९३५
राजापूर ः बाळकृष्ण परांजपे यांच्या ‘ऋणानुबंध‘ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म. बा. चव्हाण, राधेश्याम पांडे, लेखिका अनघा लिमये.


ऋणानुबंध पुस्तकाचे प्रकाशन

राजापूर ः तालुक्यातील कोंडसरबुद्रुक गावचे ज्येष्ठ नागरिक व माजी पोलिस पाटील बाळकृष्ण तथा तात्या परांजपे यांनी ८४ व्या वर्षी लिहिलेल्या ‘ऋणानुबंध‘ या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन आडिवरे हायस्कूलमध्ये झाले. या वेळी माजी मुख्याध्यापक म. बा. चव्हाण, राधेश्याम पांडे, लेखिका अनघा लिमये आदी उपस्थित होते. या पुस्तकाचा उपयोग युवकांना नवी दिशा मिळवण्यासाठी होईल असा विश्‍वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
--

कोंढेतडला खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

राजापूर ः शहरानजीकच्या कोंढेतड येथील श्रीगणेश मंडळ कुवळेकरवाडी मंडळाच्यावतीने खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हळदीकुंकू समारंभानिमित्ताने आयोजित स्पर्धेत विनामुल्य प्रवेश देण्यात येणार असून या स्पर्धेत सातवीपासून पुढे कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहे. सोलो (एकेरी) नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्‍या स्पर्धकांनी नावे २१ जानेवारीपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धे संबंधी माहितीसाठी मुकुंद सावंत, मुकेश कुवळेकर, प्रकाश शिंदे आणि दिलीप नलावडे यांच्याशी संपर्क साधावा.
--------

फोटो ओळी
-rat२५p६.jpg-
७०८६०
धनश्री हिचा सत्कार करताना संजीवन साळवी
--

धनश्री साळवीचा शाळेत सत्कार

गावतळे ः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्‍या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या नासा भरारी हा उपक्रम हाती घेतला. या स्पर्धेत तालुक्यातील शिरसोली शाळेतील धनश्री संजय जाधव हिची निवड झाली. तिचा कारगील योद्धे संजीवन साळवी यांनी शाळेत जावून सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांनी गगनभरारी घ्यावी यासाठी आपला उत्कर्ष करावा, त्यांचा झेंडा त्रिलोकी फडकवावा ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. ती पूर्ण करीत आईवडील गुरुजन आणि तिरंगा याबद्दल सर्वांनी अभिमान बाळगावा, असे सांगितले. या वेळी मुख्याध्यापक मजीद नांदगावकर, प्रीती खैरे, अरविंद जाधव, आवाशी शाळेचे पदवीधर शिक्षक सुरेश पाटील, प्रकाश कांबरे आदी उपस्थित होते