सरपंचांना धमक्या, आमिषे बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरपंचांना धमक्या, आमिषे बंद करा
सरपंचांना धमक्या, आमिषे बंद करा

सरपंचांना धमक्या, आमिषे बंद करा

sakal_logo
By

70946
निरवडे ः सरपंच आणि सदस्यांना सन्मानित करताना शालेय मंत्री दीपक केसरकर.
70947
सोनुर्ली ः सरपंच आणि सदस्यांना सन्मानित करताना शालेय मंत्री दीपक केसरकर.


सरपंचांना धमक्या, आमिषे बंद करा

शिक्षणमंत्री केसरकरांचा राऊतांना इशारा; शिंदे गटाच्या सदस्यांना निधी पडू देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप करणाऱ्यांनीच स्वतः खोके घेतले आहेत. निवडून आलेल्या आमच्या सरपंचांना खासदार विनायक राऊतांनी धमक्या आणि आमिषे दाखवून फोडण्याचे प्रयत्न बंद करावे; अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. स्थानिक स्तरावर भांडत बसू नका. शिंदे गटाच्या माध्यमातून निवडून आलेल्या सरपंचांना कोठेही निधी कमी पडू देणार नाही. ग्रामपंचायती आमच्याकडून गेल्या असे म्हणत बसू नका, पुन्हा एकदा कामाला लागा, असेही आवाहन केसरकर यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सरपंचांसह सदस्य व पॅनेल प्रमुखांचा सन्मान आज येथील वैश्य भवन सभागृहात मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, शहराध्यक्ष बाबू कुडरकर, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, सचिन देसाई, वर्षा कुडाळकर, सुनील मोरजकर, आबा केसरकर, रमेश तावडे, संभाजी रावराणे, नीता सावंत, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
मंत्री पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकार आणायचे आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर भांडत बसू नका. शिंदे गटाच्या माध्यमातून निवडून आलेल्या सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती; परंतु आयत्यावेळी युती न झाल्याने पुढची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आमच्याकडून ही ग्रामपंचायत गेली, ती गेली असे म्हणत बसू नका. पुन्हा एकदा या ठिकाणी आमचीच सत्ता असेल, असा विश्वास बाळगा. राज्याच्या विकासासाठी युतीच्या माध्यमातून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यासाठी कोण आमच्यावर आरोप करीत असतील तर ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही सकारात्मक काम करणारे आहेत. त्यामुळे या पुढे वेगळ्या पध्दतीने राज्याचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा विकास झालेला दिसेल. शासकीय योजना लोकांपर्यत कशा पोहोचतील, यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक असलेला निधी मी उपलब्ध करून देईन.’’
केसरकर म्हणाले, ‘‘मी आमदार झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालत नाही; मात्र विधानसभेत सर्वचजण मदत करतात. त्यामुळे मी कोणाच्या विरोधात जाऊ इच्छित नाही. त्यामुळे मी प्रचाराला आलो नाही; मात्र याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. कामामुळे जिल्ह्यात वारंवार येणे शक्य होत नाही; मात्र माझ्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन अनेक जण गैरसमज पसरवत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना यातून बाहेर काढून वस्तुस्थिती समजून देणे गरजेचे आहे. आम्ही शिवसेना सोडण्यास खासदार राऊतच जबाबदार आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्यानंतर ते आपणच मुख्यमंत्री असल्यासारखे वागायचे, म्हणून पुढचा प्रकार घडला. आताही त्यांच्याकडून तोच प्रकार सुरू आहे. शिंदे गटातून निवडून आलेल्या सरपंचांना धमक्या आणि आमिषे दाखवून फोडण्याचे ते काम करीत आहे; परंतु असा प्रकार केल्यास येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवू. मी मतदारांना भेटत नाही, असे सांगून राऊत माझ्यावर टीका करीत आहेत; मात्र माझ्याकडे शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी आहे. या काळात मी अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे केली आहेत. त्यामुळे थोडासं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले; परंतु त्याचा फायदा कोण घेत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवू. माझ्याकडे मुंबई आणि कोल्हापूरची जबाबदारी आहे; मात्र भविष्यात शिंदे गटाचे संपर्कमंत्री नेमले जाणार असून सिंधुदुर्गची जबाबदारी मला मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जिल्ह्याला त्याचा निश्चितच फायदा होईल.’’ यावेळी तालुकाप्रमुख गवस, मांजरेकर व राणेंनी आपले विचार मांडले.
नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार
येथील विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेगुर्ले व दोडामार्ग येथील ग्रामपंचायत सरपंचांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पॅनलप्रमुखांनाही सन्मानित करण्यात आले. यात दोडामार्ग तालक्यातील मोर्ले सरपंच संजना धुमासकर, सदस्य गायत्री गवस, गौरी देसाई, दीप्ती मणेरीकर, केर सरपंच रुक्मिणी नाईक, सदस्य मेघना देसाई, यशवंत देसाई, लक्ष्मण घारे, गायत्री देसाई, लक्ष्मी धुरी, प्रियांका देसाई, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, सदस्य विनिता गवस, संजना गवस, उज्वला कांबळे, विशाल गवस, गोविंद राऊत, पिकुळे सरपंच आप्पा गवस, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, मांगेली सरपंच सुनंद नाईक, कोलझर सरपंच सुजल गवस, झरेबांबर अनिल शेटकर, घोटगे सरपंच भक्ती दळवी, अस्मिता गवस, घोटगेवाडीचे श्रीनिवास शेटकर आदींचा समावेश होता. सावंतवाडी तालुकाः साटेली तर्फ सातार्डा सरपंच श्रावणी नाईक, सदस्य राजन नाईक, रघुनाथ नाईक, शंकर नाईक, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, सदस्य भालू गावकर, प्रवीण गाड, आप्पा पालयेकर, सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब, चराठे सरपंच प्रचिता कुबल, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सदस्य अंगारिका गावडे, माजी सरपंच सदा गावडे, संतोष गावडे, संजू गावडे, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, रमेश निर्गुण, माजी सरपंच प्रतिभा गावडे आदींचा सन्मान झाला. प्रेमानंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
............
चौकट
युतीचा धर्म पाळा
निवडून आलेल्या सरपंचांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले पाहिजे. सर्व सरपंचांनी युतीचा धर्मा पाळावा, गावातील लोकांच्या हितासाठी काम करा, असे आवाहन यावेळी शालेय मंत्री केसरकर यांनी केले.