रत्नागिरी-पुरवणी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पुरवणी लेख
रत्नागिरी-पुरवणी लेख

रत्नागिरी-पुरवणी लेख

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२५p३०.jpg-KOP२२L७०९४० उदय सामंतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असताना जाहीर सभेत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत.
----------------

अचूक टायमिंग साधण्यात वाकबगार नेता

प्रतिनिधी, कणकवली

राजकारणातील अचूक टायमिंग साधणारे उदय सामंत यांचा कॅबिनेट पदापर्यंतचा रंजक प्रवास अतिशय रंजक आहे. राजकारणात अचूक टायमिंग साधल्यामुळे उदय सामंत यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाला गवसणी घातली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांनी बहारदार कामगिरी बजावली आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या रुपाने कोकणच्या राजकारणात धडाडीचा कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोहचला आहे. कोकणात राणे, गिते, तटकरे यांच्या कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने आपला शिक्का आजमावला असेल तर तो उदय सामंत यांनी. सहसा कोणत्याही वादात न अडकण्याचे त्यांचे कसब आणि नशीब यांनी त्यांना नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पटापट राजकीय पायऱ्या पार केल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी विरोधकांना त्यांचे गहिरे पाणी ही दाखविले आहे. उमद्या कार्यकर्त्याने एखाद्या जिल्ह्यात अल्पावधीतच राजकीय एकछत्री अंमलबजावणीचे सामंत हे अस्सल उदाहरण आहेत. त्यांच्या रुपाने कोकणाला आणि रत्नागिरीला अजून एक कॅबिनेट पद मिळाले आहे.
असा हा राजकीय प्रवास
उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात २००४ ते २००१९ या काळात एकहाती पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे फार कमी नेते असतात. त्यात सामंत यांचा वरचा क्रमांक लागतो. रत्नागिरीत त्यांचा एकछत्री अंमल आहे. शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली होती. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्याच भाजपसोबत सत्तेत असताना मंत्रीपद भुषविले. सेना-भाजपचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व असलेल्या उदय सामंत यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आमदार म्हणून ते विजयी झाले. दहा वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला जयमहाराष्ट्र केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. त्यानंतर ही त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली. शिवसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी अचूक टायमिंग साधले. युतीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर ही महाविकास आघाडीत मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द बहरली. आताही त्यांनी योग्य टायमिंग साधत शिंदे गटाचा हात धरला आणि त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ आपसूकच पडली.
जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनात बंड केले होते. या बंडात त्यांना आमदारांनीच नाहीतर मंत्र्यांनीही साथ दिली होती. सुरुवातीला सुरत येथे असलेल्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांचा सहभाग नव्हता. ते शिवसेना सोडून जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त होत होता. गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यावर शिवसेनेची भिस्त होती. शिंदेंचं बंड फसणार असं भाकितं वर्तवण्यात येत होती. शिवसेनेने बंड थोपवण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित होते. पण नंतर दोघेही नॉट रिचेबल झाले. उदय सांमत २६ जून रोजी नॉटरिचेबल झाल्यानंतर विमानाने थेट गुवाहाटीत पोहचले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. कोकणात शिवसेनाला खिंडार पाडण्यात केसरकरानंतर सामंत यांनी हातभार लावला. आजच्या घडीला कोकणात सामंत याना प्रतिस्पर्धी नाही अन तरीही त्यांचे कोणाशीही शत्रृत्व नाही, हेच त्यांच्या यशाचे गमक.