पावस-पावस, गोळप गटात उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-पावस, गोळप गटात उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
पावस-पावस, गोळप गटात उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

पावस-पावस, गोळप गटात उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

sakal_logo
By

पावस, गोळप गटात उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

ग्रामपंचायत निवडणूक ; शिंदे गट, ठाकरे शिवसेनेत चुरस

पावस, ता. २५ ः पावस व गोळप जिल्हा परिषद गटामध्ये थेट सरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
गणेशगुळे ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेच्या श्रावणी रांगणकर थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत. उपसरपंचपदी प्रसाद सुनील तोडणकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. कारण उपसरपंचपदासाठी स्पर्धा नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे. पूर्णगड ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या सौ. सुहासिनी सुभाष धानबा सरपंच म्हणून निवडून आले. नऊपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. शिंदे गट व भाजप युतीला सहा जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदाच्या निवडीत थोड्याशा फरकाने पराभव झाला आहे. मात्र उपसरपंचपद युतीला मिळण्याची शक्यता आहे. गावडेआंबेरे ग्रामपंचायतीमध्ये गाव पॅनेलचे लक्ष्मण सारंग निवडून आले आहेत. त्यांनी मनसे व अपक्ष उमेदवार बळीराम डोंगरे यांचा पराभव केला. त्यामुळे गाव पॅनेलचा उपसरपंच बसणार आहे. माळंगे ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले असून नऊपैकी पाच जागा व एक सरपंचपद प्राप्त केले आहे. उपसरपंचप ठाकरे गटाचा होणारा असून त्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षे या ग्रामपंचायतीमध्ये बौद्ध समाजाला प्राधान्य मिळाले नव्हते. प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त सदस्यत्व मिळाले होते. त्यामुळे यावेळी जाधववाडीमधून प्रथमच निवडून आलेले दीपक जाधव यांना उपसरपंचपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पूर्णगड व डोर्ले ग्रामपंचायतीने उपसरपंचपदाचा मान बौद्ध समाजाला दिला होता, तोच धागा पकडून मावळंगे ग्रामपंचायतीमध्ये दीपक जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. गोळप गटातील निरूळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपदासाठी सौ. श्रेयशी प्रमोद बने यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

यांची लागेल वर्णी
मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर किशोर पांचाळ उपसरपंचपदाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. त्यापूर्वी त्यांच्या पत्नीने पाच वर्षे सरपंचपद सांभाळले होते. त्यामुळे यावेळी उपसरपंचासाठी शांताराम नावले यांची एकमताने निवड होणार आहे. चांदोर ग्रामपंचायतीमध्ये शिंदे-भाजप युतीचा उमेदवार यांचा निसटता पराभव झाला. ठाकरे गटाच्या सौ. पुनम मेस्त्री निवडून आले असून नऊपैकी सहा सदस्य ठाकरे गटाचे निवडून आल्याने उपसरपंच ठाकरे गटाचा बसणार आहे.