खेड तालुक्यात पाच ठिकाणी महिलाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड तालुक्यात पाच ठिकाणी महिलाराज
खेड तालुक्यात पाच ठिकाणी महिलाराज

खेड तालुक्यात पाच ठिकाणी महिलाराज

sakal_logo
By

खेड तालुक्यात पाच ठिकाणी महिलाराज
खेड, ता. २५ : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीपैकी तिसंगी व अलसुरे ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. यातील तिसंगीच्या सरपंचपदी मनीषा कासारे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित आठ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चार महिलांनी बाजी मारल्याने गाव कारभाराची दोरी त्यांच्या हाती आली आहे. आठ ग्रामपंचायतीमध्ये २८ महिलांनी सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत प्रवेश केला आहे.
राजकीय सत्तांतरामुळे यावेळच्या निवडणुकीत ठाकरे व शिंदे गटाची शिवसेना आमने-सामने उभी टाकल्याने प्रथमच रंगतदार लढती झाल्या. विशेषत भोस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ६ उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी रेवती पाटील यांनी बाजी मारली. निळीकच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत रोमाना चौगुले विजयी झाल्या.
कोंडवली येथे शिल्पा कोंडविलकर निवडून आल्या. तर भेलसई ग्रामपंचायतीत मयुरी कदम यांनी बाजी मारली. या महिलांचे विजयामुळे ५ ग्रामपंचायतीमध्ये महिला राज आले आहे. घाणेखुंट ग्रामपंचायतीत वैशाली खापरे, मयुरी धाडवे, अंजली तांबे, रवीना खांबल, शीतल पाष्टे, शामल खताचे या ६ महिला सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. भेलसईत अश्विनी तांबे, श्रुती कदम, सुवर्णा कदम, शिवानी धाडवे, श्रद्धा कदम या ५ महिलांनी बाजी मारली. भोस्तेत प्रतीक्षा चांदणे, शबाना मणियार, रिमा राईन, प्रांजल पंदेरे या ४ महिला निवडून आल्या. कळंबणीत शिल्पा येरापल्ले, प्रियांका गमरे, साजन हंबीर, विनया बापट, संजना जोशी, अंजली हंबीर या ६ महिलांनी विजय मिळवला. निळीक येथे वैभवी जाधव, मयुरी भुवड, रिजवान देसाई, गौसिया चौगुले या ४ महिला विजयी झाल्या. कोंडीवलीत सुगंधी शिंदे, माधुरी शिंदे, अश्विनी तांबे या ३ महिला निवडून आल्या. चिंचवली येथे संजना कदम, दिपाली पवार, प्रमिला चव्हाण, मेघना पवार या ४ महिलांनी बाजी मारली. संगलट येथे अफरोजा नाडकर, फरहीन नाडकर, दीप्ती महाडिक, शालिनी तांबे, नांदिनी मोहिते या ४ महीला विजयी झाल्या.
--