
राजापूर-संक्षिप्त
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
राजापूर ः शहरातील माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांनी गरजू आणि कष्टकरी पाच व्यक्तींना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आपला 64 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी तालुक्यातील भू आणि शहरातील पाच महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले श्री. नार्वेकर यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे.
मैदानी स्पर्धेत श्रेया
थारळीचे यश
राजापूर ः तालुक्यातील मोगरे थारळीवाडीची सुकन्या व शेठ बबनराव पडवळ विद्यालय ठाणे या प्रशाळेत नववीमध्ये शिकत असलेली श्रेया संतोष थारळी हिने शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, गोळाफेक, क्रॉसकंट्री या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची दखल घेवून तिला उत्कृष्ठ खेळाडू चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रेयाचे वडील खासगी कंपनीत कामाला आहेत, तर आई गृहिणी आहे.