निवडणूक प्रचार कार्यालय सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्रचार कार्यालय सुरू
निवडणूक प्रचार कार्यालय सुरू

निवडणूक प्रचार कार्यालय सुरू

sakal_logo
By

-rat25p48.jpg -KOP22L70990 राजापूर ः सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या निवडणूक प्रचार व संपर्क कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी संदीप मालपेकर, जयंत अभ्यंकर व उपस्थितीत मान्यवर
----------
सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे
प्रचार कार्यालय सुरू
राजापूर अर्बन निवडणूक ः प्रचाराचा प्रारंभ
राजापूर, ता. २५ ः राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय सहकार पॅनेलने सहकार पॅनेलचे निवडणूक प्रचार व संपर्क कार्यालय सुरू केले आहे. शहरातील शिवाजीपथ रस्त्यानजीक आज या कार्यालयाचा प्रारंभ राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनेलने ही निवडणूक सहकार पॅनेलच्याच माध्यमातुन लढवण्याचे निश्चित केले असून त्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आज संपर्क व प्रचार कार्यालयाचा आरंभ करण्यात आला. या वेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष जयंत अभ्यंकर, जिल्हा बँक संचालक अमजद बोरकर, बँकेचे माजी अध्यक्ष लियाकत काझी, माजी नगराध्यक्ष रमाकांत मालपेकर, सुरेश कोळेकर, मधुकर देवरूखकर, विद्यमान संचालक अड. शशिकांत सुतार, हनिफ काझी, संजय ओगले, अनिलकुमार करंगुटकर, विजय पाध्ये, प्रसाद मोहरकर, रज्जाक डोसानी, माजी नगरसेवक हनिफ युसुफ काझी, महीला पतपेढीच्या अध्यक्षा रसिका कुशे, शीतल पटेल, स्वाती करंगुटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमराव कोंडवीलकर, इरफान डोसानी आदींसह मान्यवर उपस्थित होते. अभ्यंकर यांनी सहकार पॅनेलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात बँकेने केलेली प्रगती आणि सभासदांचा विश्वास यामुळे सहकार पॅनेलचा विजय निश्चित असल्याचे नमूद केले. या वेळी अमजद बोरकर, काझी, अड. सुतार, संदीप मालपेकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.