संक्षिप्त-आंदुर्लेत गुरुवारी पादुकांचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-आंदुर्लेत गुरुवारी
पादुकांचे आगमन
संक्षिप्त-आंदुर्लेत गुरुवारी पादुकांचे आगमन

संक्षिप्त-आंदुर्लेत गुरुवारी पादुकांचे आगमन

sakal_logo
By

संक्षिप्त

आंदुर्लेत गुरुवारी
पादुकांचे आगमन
कुडाळ ः आंदुर्ले-वीराचे पाणी येथील पाटील-पाडगावकर परिवार यांच्या निवासस्थानी 29 ते 30 दरम्यान कालावधीत श्री सद्गुरुनाथ डॉ. केशवरावजी रामचंद्र जोशी महाराज यांच्या कृपेने श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या पादुकांचे आगमन होणार आहे. 29 ला सायंकाळी 5 वाजता पादुकांचे आगमन, 5.30 वाजता सायंपूजा, शांतिपाठ, आरती, 7.15 वाजता शरद घाग (नृसिंहवाडी) यांचे कीर्तन, 30 ला पहाटे 5 वाजता काकड आरती, 8 वाजता सत्यदत्त पूजा, पादुकांची महापूजा, दुपारी 1 वाजता ''श्रीं''ची आरती व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता पादुकांचे पाट येथे प्रस्थान होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील-पाडगावकर यांनी केले आहे.

वाभवेत बुधवारी
भजन डबलबारी
वैभववाडी ः वाभवे येथील श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा 28 ला आयोजित केला आहे. यादिवशी सकाळी गणेश पूजन, अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री 9.30 वाजता बुवा सुशील गोठणकर व बुवा संतोष शिर्सेकर यांच्यात पारंपरिक डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे.

कलेश्वर विद्यामंदिरचे मैदानी स्पर्धांत यश
कुडाळ ः ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये हातोडा फेक या क्रीडा प्रकारात येथील श्री कलेश्वर विद्यामंदिरची विद्यार्थिनी श्रुती नारिंग्रेकर ही विजेती ठरली. सातारा येथे होणार्‍या विभागस्तरीय स्पर्धेसाठी ती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात याच विद्यालयाच्या अनघा नेरुरकरने प्रथम, तीन किलोमीटर चालणे प्रकारात शुभांगी नेवगी प्रथम, 14 वर्षीय मुलगे रिले प्रथम, 17 वर्षीय मुलगे पाच किलोमीटर चालणे शुभम नेरुरकर द्वितीय यांनी क्रमांक प्राप्त केला. या सर्वांना क्रीडा शिक्षक शिवदासकुमार मसगे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष कमलाकर नाईक, समिती चेअरमन विजय सावंत, प्रदीप नाईक, अनिल नाईक, सखाराम कदम, मुख्याध्यपिका सुनिती नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन केले.

भजनी कलाकारांचा दोडामार्गात सत्कार
दोडामार्ग ः तळेखोल येथील ग्रामस्थ दिवसभर शेतात काम करून रात्री तालुक्यासहीत गोवा व इतर ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून भजनसेवा सादर करतात. तेथील समितीतर्फे सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक व अ‍ॅड. सोनू गवस यांच्या हस्ते बाबाजी दळवी, गोविंद दळवी, सुमीत्रनाथ गवस, सदानंद शेटकर, आपा गवस व इतर भजनी कलाकारांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

निवासी शिबिराचा वागदेत समारोप
कणकवली ः कणकवली कॉलेज कनिष्ठ विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र कणकवली कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप वागदे- गोपुरी आश्रम येथे उत्साहात झाला. शिबिराच्या समारोपप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य आर. बी. चौगुले, पर्यवेक्षक प्रा. एम. डी. कांबळे, कनिष्ठ महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. डी. पाटील, प्रा. सौ. व्ही. एस. सावंत, प्रा. पी. एम. सावंत, प्रा. एम. जे. कांबळे, प्रा. विजय सावंत, गोपुरी आश्रम संचालक बाळू मेस्त्री, वैभव राणे, विलास कदम आदी उपस्थित होते.


आडवलीत सेल्फी पॉईंटचे उद्‍घाटन
मालवण ः ग्रामपंचायत आडवली-मालडीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन गावचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. मालवण तालुक्यात ग्रामपंचायतच्या वतीने बनविलेला आडवली येथील हा पहिला सेल्फी पॉईंट ठरला आहे. सरपंच संदीप आडवलकर, उपसरपंच सोनाली पराडकर, सदस्य ज्योती लाड, सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरुण लाड, अरविंद साटम, विठ्ठल घाडी, विष्णू घाडीगावकर, माजी उपसरपंच विनोद साटम, पोलिस पाटील चंद्रदीपक मालडकर, पशु पर्यवेक्षक महेश परुळेकर, सागर तांबे, डॉ. सुरेश भोगटे, पळसंबचे नवनिर्वाचित सरपंच महेश वरक, ग्रामसेवक युवराज चव्हाण, आडवली -मालडी रिक्षा संगठनेचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


बांदिवडे सरपंचपदी मयेकर यांची निवड
मालवण ः आजपर्यंत भाजपचे वर्चस्व असलेली बांदिवडे ग्रामपंचायत आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात येऊन सरपंचपदी युवासेनाध्यक्ष अनंत उर्फ आशू मयेकर या युवा नेतृत्वाची निवड झाली. शिवसेनेचा एक उमेदवार जातप्रमाणपत्रामुळे बाद ठरला. तर श्रुती गावकर, पुष्पक घाडीगावकर, स्वप्नील मुणगेकर व नारायण परब हे चार सदस्य शिवसेनेतून निवडून आले. तर भाजपमधून अंजली घाडीगांवकर व स्वाती संदीप आईर निवडून आले. सरपंच मयेकर व सर्व विजेत्या सदस्यांचे गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.