
‘आपदा मित्र’ प्रशिक्षणास मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद
71010
मालवण ः आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. एम. आर. खोत यांनी मार्गदर्शन केले.
‘आपदा मित्र’ प्रशिक्षणास
मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात जिल्ह्यातील तरुण व तरुणींना मास्टर ट्रेनर म्हणून लेफ्टनंट डॉ. प्रा. एम. आर. खोत यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अनेक आपत्तींमध्ये जीवितहानी कशाप्रकारे कमी करता येईल, नुकसान कमी होण्यासाठी काय करता येईल या संदर्भात तसेच भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, दुष्काळ, उष्ण लहरी, शीतलहरी, विजेचा कडकडाट अशा आपत्तींच्या काळात काय करावे, कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रा. खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन सुभेदार इंद्र केसर, राजश्री सामंत, संजय यादव, नेत्रा पवार उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातून ३० तरुणींसह ६४ तरुण सहभागी झाले आहेत. भविष्यकाळात आपत्ती नियंत्रणासाठी अशा प्रकारची टीम तयार करून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी हे शिबिर महत्वपूर्ण ठरत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना सुरक्षा कवच कीट व पाच लाखांचा पाच वर्षांसाठी विमा सरकारकडून मोफत दिला जाणार आहे.