Mon, Feb 6, 2023

-
-
Published on : 25 December 2022, 3:39 am
आंब्याला पोषक
दापोली तालुक्यात यंदाचे सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी ११.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे. कमाल तापमान ३० अंश आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत होते. मात्र आजपासून पारा घसरल्यामुळे आंब्याला पोषक वातावरण तयार झाले आहे. पालवीला मोहोर येण्यास पोषक स्थिती असून मोहोराला लवकर फूट येण्यास सुरुवात होईल. यापूर्वी दापोलीत १४ अंश तापमान खाली उतरले होते.