चिपळूण-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-संक्षिप्त
चिपळूण-संक्षिप्त

चिपळूण-संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२५p२५.jpg- KOP२२L७०९२६
चिपळूण ः वंश राठोडबरोबर प्रा. नीरज लिमये, तालुका समन्वयक श्री. कळंबे.
-------------
पवार महाविद्यालयाचे
चालणे स्पर्धेत यश
चिपळूण ः जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील पाच हजार मीटर चालणे या क्रीडा प्रकारात शहरातील आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाला घवघवीत यश मिळाले. ही स्पर्धा खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील (कै.) गोविंदराव निकम क्रीडानगरीत घेण्यात आली. यात आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाचा वंश राठोड याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. क्रीडा विभागाचे प्रा. नीरज लिमये यांनी वंश राठोडला मार्गदर्शन केले.


तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेते
चिपळूण ः तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील क्रिकेट या क्रीडा प्रकारात आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाला घवघवीत यश मिळाले. यात महाविद्यालयातील मुलांचा आणि मुलींच्या संघाचा अंतिम सामना डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाशी झाला. यात मुलींच्या संघाला उपविजेतेपद, तर मुलांचा संघ विजयी झाला. मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते येथील (कै.) गोविंदराव निकम क्रीडानगरीत घेण्यात आली. मुलांच्या संघात अरमान अन्सारी (कर्णधार), शाहिद कोंडेकर, राकेश शिगवण, प्रथमेश पंदेरे, हर्ष डिगे, रोशन राम, कल्पेश चिपळूणकर, यश साळुंखे, मिहीर चव्हाण, प्रथमेश उमासरे, आदित्य लाड, अतुल बेंद्रे, बांद्रे, ओमश्री बुरटे, अंश मोहिते आणि सुजल बुरटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलींच्या संघात दीक्षा नरळकर (कर्णधार), अक्षता नरळकर, श्रावणी कासेकर, वेदिका पवार, अक्षता बोडेकर, सोनम यादव, समृद्धी किजबिले, आरती खापरे, प्रांजळ रसाळ, सानिका कोकरे, नेहा खेडेकर आणि श्रेया धामणस्कर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.