मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’
मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’

मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’

sakal_logo
By

71040
सिंधुदुर्गनगरी ः मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’ पुरस्कार देताना आमदार बाळाराम पाटील.

मकरंद आपटेंना ‘कोकणरत्न’
कणकवली ः कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेमध्ये संस्कृत व इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक मकरंद नारायण आपटे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्ल महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीतर्फे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते कोकणरत्न पुरस्कार २०२२ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे हा कार्यक्रम झाला. संस्कृत विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून मकरंद आपटे यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. गेस्ट लेक्चरर म्हणून अनेक शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. क्रीडा शिक्षक नसतानाही खेळामधील आवड म्हणून ते विद्यार्थ्यांना कॅरम व बॅडमिंटन या खेळांचे खास प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांच्या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीयस्तरावर तर १७ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यात दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने तर सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक प्राप्त केले आहे.