निसर्गचित्रणाबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गचित्रणाबाबत मार्गदर्शन
निसर्गचित्रणाबाबत मार्गदर्शन

निसर्गचित्रणाबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

71074
पाट ः निसर्गचित्रणाचा पाट विद्यालयाच्या विद्यार्थ्याने आनंद घेतला

निसर्गचित्रणाबाबत मार्गदर्शन
कुडाळ ः जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील विद्यार्थी प्रथमेश करलकर यांच्या प्रत्यक्ष निसर्गचित्रणाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. एखाद्या स्पॉटवर जाऊन चित्रण करण्याचा आनंद काय असतो, याचा अनुभव पाट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी वनभोजनाच्या निमित्ताने अनुभवला. शाळेच्या वनभोजनाच्या ठिकाणी विविध कार्यक्रम होतात. पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आर्ट कॉलेजमधील विद्यार्थी करलकर यांनी एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नववीच्या इंटरमिजिएट विद्यार्थ्यांनी कोचरा रामेश्वर मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या उपस्थितीत केले होते. यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यक्षवेक हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी केरकर, साळगावकर, पवार आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक संस्था सचिव सुधीर ठाकूर, चेअरमन समाधान परब यांनी केले.
---
71075
माड्याचीवाडी ः तन्वी मयेकर, साक्षी खरुडे यांच्या समवेत मुख्याध्यापक रावण, मयेकर.

साक्षी खरुडे, तन्वी मयेकरची निवड
कुडाळ ः माणगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय वैयक्तिक स्पर्धेत माड्याचीवाडी विद्यालयातील कुमारी तन्वी मयेकर हिने १०० मीटर धावणे, तर साक्षी खरुडे हिने ४०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही स्पर्धकांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी स्पर्धकांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक राजन मयेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, मुख्याध्यापक बाळकृष्ण रावण आदींनी अभिनंदन केले.