मैदानी स्पर्धेत राणे इंग्लिश स्कूलचे सुयश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानी स्पर्धेत राणे इंग्लिश स्कूलचे सुयश
मैदानी स्पर्धेत राणे इंग्लिश स्कूलचे सुयश

मैदानी स्पर्धेत राणे इंग्लिश स्कूलचे सुयश

sakal_logo
By

rat२६१४.txt

(टुडे पान ३ साठी)

मैदानी स्पर्धेत राणे इंग्लिश स्कूलचे सुयश

पावस, ता. २६ ः लांजा तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ व मैदानी वैयक्तिक क्रीडा प्रकारात ज्ञानेश्वर विद्यामंदिर व (कै.) एकनाथ राणे इंग्लिश मिडीयम हायस्कूलने यश संपादन केले. जिल्हा स्पर्धेसाठी शाळेच्या १८ खेळाडूंची निवड झाली आहे. कबड्डीमध्ये १४ वर्षे मुलांचा संघ तृतीय फुटबॉल १७ वर्षे मुलांचा संघ द्वितीय, बुद्धिबिळ स्पर्धेत १० मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामध्ये १४ वर्षे वयोगटात स्वीटी पाटोळे, श्रृती पाटोळे, साई चव्हाण, ओमकार रेडीज, कृष्णा कुमावत व १७ वर्षे गटात अबान मुजावर, श्रेयस बावधकर, श्रेयस पंडित, आर्या कदम, श्रावणी सार्दळ या मुलांचा समावेश होता. मैदानी वैयक्तिक क्रीडा प्रकारात ८ मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षे वयोगटात १०० मी. धावणेमध्ये सार्थक वीर प्रथम, दुर्वेश गुरव द्वितीय, गोळा फेकमध्ये वेदांग दळी द्वितीय, ६०० मी. धावणे अथर्व माजळकर तृतीय, अशरीन नाईक तृतीय तर ४ बाय१०० मी. रिलेमध्ये मुलांचा संघ प्रथम आला. १७ वर्षे वयोगटात गोळाफेक यशोदीप बावधकर प्रथम, ओम नेमण २०० मी. धावणे द्वितीय व १००मी. अडथळा शर्यत प्रथम आला. १०० मी. रिलेमध्ये मुलांचा संघ तिसरा आला. या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सुशिल वासुकर यांचे मार्गदर्शन मिळाले.