
पालकमंत्री सामंतांच्या वाढदिवसानिमित्त भैरीबुवाकडे प्रार्थना
rat२६२१.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२६p१४.jpg-
७१११३
रत्नागिरी ः मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री देव भैरीला प्रार्थना करण्यात आली.
-----
रत्नागिरी ग्रामदैवताला अभिषेक
पालकमंत्री सामंतांच्या वाढदिवस ; विविध कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी, ता. २६ : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शहरांमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांना दीर्घायु लाभो यासाठी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीला अभिषेक व प्रार्थना करण्यात आली. यावेळी रत्नागिरी शहरच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवासनिमत्त गेली तीन दिवस शहरात विविध उपक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. रत्नागिरीच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आज रत्नागिरीत अनेक कार्यक्रम घेतले. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. बाल सुधारगृहातही लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट, केक व खाऊ वाटप करण्यात आला. त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, महिला शहरप्रमुख स्मितल पावसकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, संघटक सौरव मलुष्टे, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, विकास पाटील, किरण सावंत, प्रशांत सुर्वे, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, युवासेना शहरप्रमुख अभिजित दुडे आदी उपस्थित होते.