सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी 29 विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी 29 विद्यार्थ्यांची निवड
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी 29 विद्यार्थ्यांची निवड

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी 29 विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

rat२६२२.txt

(टुडे पान २ साठी)

गोडबोले पुरस्कारासाठी २९ विद्यार्थ्यांची निवड

चतुरंग प्रतिष्ठान ; १५ जानेवारीला वितरण

चिपळूण, ता. २६ ः चतुरंग अभ्यास वर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुवर्य स्व. एस. वाय. गोडबोले गुरुजींच्या नावाने २१ वर्षांपुर्वी सुरू केलेल्या चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी २९ विद्यार्थ्यांची निवड झाली. या पुरस्काराचे वितरण १५ जानेवारीस चिपळूणात होणार आहे.
चतुरंगच्या चिपळूण कार्यालयात मुलाखती २४ व २५ डिसेंबरला घेण्यात आल्या. मुलाखतीस ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २९ शाळांतील २९ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी झाली आहे.
भगिरथ ग्रामविकास संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डेरवण इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका शरयू यशवंतराव, गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यपक राजेंद्र वारे या तिघांनी यावर्षी निवड सामिती सदस्य म्हणून काम केले. निवड झालेले विद्यार्थी असे ः अनुष्का संकपाळ (अलोरे विद्यालय), आकाश गरवारे (पोफळी न्यू इंग्लिश स्कूल), समता जाधव (माखजन इंग्लिश स्कूल), श्रवण पावशे (पालगड विद्यामंदिर), अमेय घाणेकर (कोंडगाव विद्यालय), कुणाल मुंडेकर (आबलोली विद्यालय), आर्यन केसरकर (लांजा इंग्लिश स्कूल), वीरप्रतापसिंह पाटील (जाकादेवी विद्यालय), प्रणव गायकवाड (निकम विद्यालय), सोहम साने (ए. जी. हायस्कूल), जिज्ञा बोरवणकर (शिर्के प्रशाला), कनिष्का बावधनकर (श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिर), सुयश अरमरे (मार्गताम्हाणे इंग्लिश स्कूल), श्रावणी भालेकर (खेर्डी न्यू इंग्लिश स्कूल), यश नेवरेकर (पाग न्यू इंग्लिश स्कूल), आर्या जुवेकर (युनायटेड इंग्लिश स्कूल), सई भागवत (भागवत माध्यमिक विद्यालय), आर्या भावे (पालशेतकर विद्यालय), संगम रांगले (आंबेडकर हायस्कूल), वेदांत शिवणकर (पाटपन्हाळे इंग्लिश स्कूल), श्रिया काजळे (राजापूर हायस्कूल), प्रांजल गोणबरे (मालगुंड विद्यालय), प्रियांका गवंडी (ठाकरे विद्यालय, साडवली), गायत्री बांडागळे (देवरूख इंग्लिश स्कूल), मधुरा करमरकर (फाटक हायस्कूल), समिक्षा जाधव (भागवत विद्यामंदिर, बोरगाव), आदिनाथ वारे (निवळी विद्यालय), तनिश मोदी (परशुराम इंग्लिश स्कूल), प्रांजल चाचुर्डे (गद्रे स्कूल).