
दारुम येथे आज धार्मिक कार्यक्रम
70995
श्री सिध्देश्वर मंदिर
दारुम येथे आज धार्मिक कार्यक्रम
तळेरे : दारुम येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिराचा पहिला वर्धापन दिन मंगळवारी (ता. २७) उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात २७ ला सकाळी गणेशपूजन, मंदिर पूजा, अभिषेक, नांदी श्राद्ध, स्थळावृद्धी, श्री सिद्धेश्वर मंदिर लघुरुद्राभिषेक, देवता महापूजा, वशिक आदिनाथ, गांगो खर्जादेवी, भवका देवी, सहदेवता एकादशनी, महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्प व सांगता आभिषेक, दुपारी पालखी प्रदक्षिणा व ढोल वादन, महाप्रसाद व ओटी भरणे, सायंकाळी दारुम येथील वाडीवार भजने, रात्री श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरेचे बुवा संतोष तळेकर यांचे भजन, त्यांनतर श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, ठाणेचे रायगड भूषण बुवा संतोष शीतकर, विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, बोरिवलीचे बुवा विशाल मसुरकर आणि श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, भांडुपचे बुवा सुनील गोठणकर यांच्या तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.