
पाथर्डीत नातू महाविद्यालयाचे निवासी शिबिर
rat२६२४.txt
बातमी क्र. २४ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
- ratchl२६२.jpg-
L७१११९
चिपळूण ः पाथर्डी मिरवणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी मान्यवर.
---
पाथर्डीत नातू महाविद्यालयाचे निवासी शिबिर
चिपळूण, ता. २६ ः मार्गताम्हाने एजुकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन मिरवणे पाथर्डी ग्रुप ग्रामपंचायतीमधील प्राथमिक शाळेत झाले. शिबिरात नंदू तांबे यांचे कोकणातील जैवविविधता खासगी वने प्रकल्प भेट, आरोग्य तपासणी शिबिर, महिला मेळावा, महिला आरोग्य विषयक समस्या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. श्रमदानातून विविध कामे करण्यात येणार आहेत.
डॉ. नामदेव डोंगरे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरातील उपक्रम सांगितले. शाळा व्यवस्थपन समिती अध्यक्ष विजय गुढेकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. सरपंच संजय भडवलकर यांनी शिबिरासाठी ग्रामस्थांच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. चेअरमन मधुकरराव चव्हाण यांनी सहभागी स्वयंसेवकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. राजश्री कदम यांनी शिस्तीचे पालन करण्याची सूचना केली. व्यक्तिमत्व विकास विषयावर मुख्याध्यापक संजय चव्हाण, विकास चांदे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याध्यापिका स्मिता वीरकर, नेहा तांबे, मनोहर आवटे, ग्रामसेविका जान्हवी साळवी, संगीता काटकर, दिलीप काणेकर, भरत देवरुखकर, डॉ. सुरेश सुतार, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. सत्येंद्र राजे, प्रा. रामचंद्र माने उपस्थित होते.