किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किक बॉक्सिंग स्पर्धेत 
दाणोली हायस्कूलचे यश
किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचे यश

किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचे यश

sakal_logo
By

७११३८


किक बॉक्सिंग स्पर्धेत
दाणोली हायस्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २६ ः सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलनात घेण्यात आलेल्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दाणोली येथील (कै.) बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाच्या अमोल पाटील याने मुलांमधून, तर साक्षी लांबर हिने मुलींमधून सुवर्ण पदक पटकावत विभागात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
या स्कूलच्या दहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. किक बॉक्सिंग स्पर्धेत मुलांच्या गटातून या हायस्कूलमधील अमोल पाटील याने सुवर्ण, तर विक्रांत कासले याने रजतपदक पटकावत विभागात अनुक्रमे प्रथम आणि दुसरा येण्याचा मान मिळविला. मुलींमधून साक्षी लांबर हिने सुवर्णपदक पटकावत विभागात प्रथम आली. याच हायस्कूलच्या निर्मला पाटील, सरिता पाटील, आर्या गावडे यांनी कांस्यपदक फटकावले. चैतन्य भोसले, सिद्धेश डोईफोडे, तुकाराम टायशेटे, सखाराम गोरे यांनीही चमकदार कामगिरी बजावली. अमोल पाटील आणि साक्षी लांबर यांची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. हायस्कूलचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकले असून क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरा सुरू ठेवली आहे. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक आर. जी. पाटील यांचे संस्थेचे अध्यक्ष झिला पाटयेकर, मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.