Sun, Feb 5, 2023

गुहागर-मार्गताम्हाने स्कूलचा आज नामकरण सोहळा
गुहागर-मार्गताम्हाने स्कूलचा आज नामकरण सोहळा
Published on : 26 December 2022, 1:42 am
मार्गताम्हाने स्कूलचे आज नामकरण
गुहागर : मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा मंगळवारी (ता. २७) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या शाळेचे डी. व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल असे नामकरण होणार असून आयआयएसईआर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डाँ. श्री. अरविंद नातू यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी विशेष अतिथी म्हणून शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. कॅप्टन चंद्रशेखर चितळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागतोत्सुक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले आहे.