गुहागर-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-संक्षिप्त
गुहागर-संक्षिप्त

गुहागर-संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२७p१५.jpg- KOP२२L७११८१ गुहागर ः विजयी स्पर्धकांसोबत अनुज साळवी.
-----------
‘सनमार्क दुबई ओपन’मध्ये
अनुज साळवीला दोन पदके
गुहागर ः गुहागर तालुक्यातील आबलोली येथील अनुज संदेश साळवीने जागतिक मान्यता प्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे झालेल्या सनमार्क दुबई ओपन स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली. राजापूर येथील नवोदय विद्यालयाची ती विद्यार्थी आहे. या स्पर्धेत जगभरातील २८ देशांमधून १५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारत, जॉरर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, इजिप्त, कॅनडा, सीरिया, युनायटेड किंगडम, तुर्के, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, ओमन, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्वेडोर इत्यादी देशांचा सहभाग होता. तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचा सुपुत्र अनुज साळवी याने एक रौप्य व एक कास्यपदक पटकावले.
यापूर्वी अनुज साळवी याने जागतिक दर्जाच्या क्यूब स्पर्धेतमध्ये मुंबई येथे घेण्यात आलेल्या फिनिक्स क्यूब चॅलेंज २०२२, केरळ येथील एमक्यूब ओपन २०२२ आणि पुणे येथील घेण्यात आलेल्या आयआयएसईआर पुणे क्यूब ओपन २०२२ या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.
------

ग्राहक पंचायतीची २९, ३० ला कार्यकारिणी सभा
गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देश पातळीवरील सर्वात मोठी ग्राहक हितासाठी काम करणारी सेवाभावी संघटना आहे. या संघटनेची रत्नागिरी येथील माधवराव मुळ्ये भवन संघ कार्यालयामध्ये २९ व ३० डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा कोकण प्रांतात पहिल्यांदाच होत आहे. यासाठी देशभरातील ३८ प्रांतातून सुमारे ५० कार्यकारिणी सदस्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी सभेनिमित्ताने तालुका व जिल्हा पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नारायणभाई शहा, राष्ट्रीय सचिव श्री. अरुण देशपांडे, राष्ट्रीय संघटक श्री. दिनकर सबनीस हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचे विविध राज्यातून आलेल्या कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन लाभणार असल्याचे राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी यांनी सांगितले. २०२४ मध्ये ग्राहक पंचायतीच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गाव तेथे ग्राहक पंचायत अशी ग्राहक चळवळ अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासंर्भात या बैठकीत देशभरातील नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती सौ. जोशी यांनी दिली.