
लांजा शहरातील खड्डे भरणीला अखेर मुहूर्त
rat२६३३.txt
(पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat२६p१७.jpg-
७११८४
लांजा ः महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरवात झाली आहे.
---
लांजा शहरातील खड्डे भरणीला मुहूर्त
लांजा, ता. २६ ः लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यास रविवारपासून (ता. २५) सुरवात झाली. याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावसाळ्यानंतर शहरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. साटवली फाटा ते शहरातील काळा पूल या अंतरा दरम्यान मोठे खड्डे पडले होते. रिक्षा, दुचाकीसह अन्य सर्वच वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या खड्ड्यांमधून वाहने जाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडून ते व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरत होते. यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान होत होते. त्यामुळे लांजा शहरातील महामार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे किंवा पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, शहरातील वाहन चालक, व्यापारी यांच्याकडून केली जात होती. अखेर रविवारी सकाळी १० वाजल्यापासून महामार्ग ठेकेदार कंपनीमार्फत शहरात पडलेले खड्डे भरण्यास सुरवात झाली आहे.