संक्षिप्त ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त ः क्राईम पट्टा
संक्षिप्त ः क्राईम पट्टा

संक्षिप्त ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat२६३५. txt

(पान ३ साठी, क्राईम)

थिबापॅलेस येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः बंद घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मधुसुदन सुरेशचंद जोशी (वय ४६, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत जोशी हे फोन उचलत नाही म्हणून जोशी यांचा मेव्हणा सकाळी नऊ वाजता त्यांच्या घरी गेला. तेथे जाऊन पाहिले असता त्यांच्या मुख्य दरवाजाला आतून कडी होती. अखेर त्यांनी सुताराला बोलावून दरवाजा फोडला त्यावेळी जोशी बेशुद्धावस्थेत घरात पडलेले होते. तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता तेथील अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
अपघातात दोघे जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी ते गणपतीपुळे येथील आरेवारे रस्त्यावर अज्ञात चालकाने हुल दिल्याने दोन दुचाकीचा अपघात झाला. यामुळे दोघेही तरुण स्वार जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले आहे. ओमकार प्रदीप भाटकर (वय २८, रा. बसणी) व प्रितेश प्रताप सुर्वे (वय ३३, रा. नेवरे, ता. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना आज (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही रत्नागिरीकडे येत असताना अज्ञात वाहनाने हुल दिल्यामुळे दोघेही एकमेकांच्या दुचाकीवर आपटून अपघात झाला. यामध्ये दोघांनाही जखमी झाले आहे. तत्काळ उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
---
मच्छीमार्केट रस्त्यावर सापडला प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी ः तालुक्यातील पुर्णगड येथील प्रौढाचा मृतदेह शहरातील मच्छीमार्केट रस्त्यावर-खान कॉम्प्लेक्स येथील परिसरात आढळला. पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला आहे. सुनील सोनू पावसकर (वय ५७, पावसकरवाडी, पूर्णगड, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना आज (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसकर हे खान कॉम्प्लेस येथे मयत स्थितीत मिळून आले. या प्रकरणी खान कॉम्प्लेक्स येथील नागरिक रमीज झारी यांनी शहर पोलिसांना खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात आणला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
--