रत्नागिरी-प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मास्क सक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मास्क सक्ती
रत्नागिरी-प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मास्क सक्ती

रत्नागिरी-प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मास्क सक्ती

sakal_logo
By

71199
पान 1 साठी)


गणपतीपुळे मंदिरात मास्क सक्ती
देवस्थान समितीचा निर्णय; भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत आहे. त्याला रोख लावण्यासाठी केंद्र शासनाने अलर्ट जारी केला असून, राज्यातील महत्त्वांच्या देवस्थानमध्ये मास्कची सक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासह रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातही तीन दिवसांपासून मास्क सक्ती केली आहे. शासनाचा कोणताही आदेश नसला तरी खबरदारी म्हणून गणपतीपुळे देवस्थानने हा निर्णय घेतला असून तो मंदिरा परिसरापुरता सक्तीचा केला आहे.
चीनसह अन्य देशांमध्ये कोरोनाच्या बीफ ७ या नव्या व्हेरिएंटने थैमान घातले आहे. वेगाने त्याच्या फैलाव होत आहे. त्या व्हेरिएंटने देशातही शिरकाव केला असून काही रुग्ण सापडले आहेत. केंद्राने सर्वच राज्यांना खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणाऱ्या राज्यातील प्रसिद्ध देवस्थाननी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जगप्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानने देखील मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. नाताळची सुटी लागल्याने गणपतीपुळे देवदर्शन आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, अंगारकी चतुर्दशी, संकष्टीला राज्यातील विविध ठिकाणांहून लाखो भाविक येतात. गर्दीमुळे कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. ही शक्यता डोळ्यासमोर ठेवून गणपतीपुळे देवस्थानने मास्क सक्ती केली आहे. शासनाचा कोणताही लेखी आदेश आलेला नाही. तरी खबरदारी म्हणून देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. मंदिरातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पुजारी यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांनाही कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


खबरदारी म्हणून देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. लोकसभेत जेव्हा यावर चर्चा झाली, तेव्हाच राज्यातील अनेक देवस्थानप्रमाणे आम्ही तीन दिवसांपासून गणपतीपुळे मंदिरत येणाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. मंदिराच्या आवारापुरती ही सक्ती राहणार आहे.
- डॉ. विवेक भिडे, गणपतीपुळे देवस्थान