Wed, Feb 1, 2023

उपोषण अखेर सोडले
उपोषण अखेर सोडले
Published on : 26 December 2022, 1:49 am
71201
सिंधुदुर्गनगरी ः विशाल राऊळ यांनी सरबत पिऊन उपोषण सोडले.
उपोषण अखेर सोडले
सावंतवाडी तालुक्यातील मांडखोल ग्रामपंचायत शौचालय निधीत अपहार झाल्याच्या तक्रारीनुसार संबंधित सावंतवाडी गटविकास अधिकारी यांच्याकडे जिल्हा प्रशासनाने अहवाल मागितला होता. त्या अहवालात पात्र लाभार्थींनाच शौचालयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींचे अनुदान शिल्लक असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्या विशाल राहुल यांना लेखी पत्र दिल्याने त्यांनी उपोषण थांबवले. तर स्वच्छता अभियानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी त्यांना सरबत दिला.