पान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर 
सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज
पान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

पान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

sakal_logo
By

टीपः swt2620.jpg मध्ये फोटो आहे.
L71151
सिंधुदुर्गनगरी : कोविड आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व अन्य.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर
सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

पूर्वतयारी सुरू; तूर्त प्रादुर्भाव नाही

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः कोरोनाची चाहूल लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याचा प्रादुर्भाव जिल्ह्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी सतर्कतेचे आवाहन आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
कोविडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही; परंतु सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत: आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी. यंत्रसामग्री, साधनसामग्री, ऑक्सिजन प्लांट, औषधे, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, बेड याबाबत सतर्क राहावे. तालुकास्तरावरील यंत्रणांनीही सतर्कता म्हणून सर्व विभागांची बैठक घेऊन सावधानता बाळगावी. आवश्यक सुविधा तयार ठेवाव्यात.’
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनीही मास्क आणि सॅनिटायझर वापराबाबत आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते.