Mon, Feb 6, 2023

आंजिवडे घाटरस्ता समितीची
मंत्री नारायण राणेंशी चर्चा
आंजिवडे घाटरस्ता समितीची मंत्री नारायण राणेंशी चर्चा
Published on : 26 December 2022, 3:47 am
71239
आंजिवडे ः केंद्रीय मंत्री नारायण राणे, नीलेश राणे यांच्या सोबत आंजिवडे घाटरस्ता समितीचे पदाधिकारी.
आंजिवडे घाटरस्ता समितीची
मंत्री नारायण राणेंशी चर्चा
माणगाव ः आंजिवडे घाटरस्ता होण्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांची भेट घेऊन घाटरस्ता समितीने सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान मंत्री राणे यांनी पूर्ण लक्ष घालून तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आंजिवडे घाटरस्त्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी समिती अध्यक्ष अॅड. किशोर शिरोडकर, सचिव एकनाथ केसरकर, सुभाष भिसे, मोहन सावंत, प्रकाश मोरये आदी उपस्थित होते.