आयडियल स्कूलचे संमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयडियल स्कूलचे संमेलन उत्साहात
आयडियल स्कूलचे संमेलन उत्साहात

आयडियल स्कूलचे संमेलन उत्साहात

sakal_logo
By

71251
वरवडे ः येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुलांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

आयडियल स्कूलचे संमेलन उत्साहात
कणकवली,ता. २७ ः वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचा ‘आयडियल उत्सव २०२२’ हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात नुकताच झाला.
यावेळी कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच ‘आयडियल’च्या नव्याने सुरू झालेल्या ‘मार्शल आर्ट कमांडो ट्रेनिंग’मधील मल्लखांबांची चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी लक्ष वेधले. यावेळी गुणवंतांना गौरवण्यात आले. ‘पालक उत्सव’ कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी, नृत्य, फॅन्सी ड्रेस व विविध क्रीडा स्पर्धांच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांचा गौरव झाला. या कार्यक्रमाला ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक नीलेश महेंद्रकर, संचालिका हेमा तायशेटे, सुरेखा भिसे, गौसिया बुलंद पटेल, मनीषा सावंत, संचालक यज्ञेश शिर्के, रुपेश खाडये, डॉ.सुहास पावसकर, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना शेखर-देसाई आदी उपस्थित होते.