चौकुळ अपघातात दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकुळ अपघातात दोघे जखमी
चौकुळ अपघातात दोघे जखमी

चौकुळ अपघातात दोघे जखमी

sakal_logo
By

(यातील खालील फोटो घ्या)
71253
कणकवली : वागदे येथील अपघातात जखमी झालेल्‍यांना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले.

चौकुळ अपघातात दोघे जखमी

‘एलसीबी’ची तत्‍परता; मांजर आडवे आल्याने दुचाकी घसरली

कणकवली, ता.२७ : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे मांजर आडवे आल्याने दुचाकीवरून चौकुळ येथील मुलगा आणि त्‍याची वृद्ध आई महामार्गावरच कोसळली. याच दरम्‍यान त्‍या परिसरातून जाणाऱ्या एलसीबीच्या पथकाने दोन्ही जखमींना तातडीने कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
चौकुळ (ता.सावंतवाडी) येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय ६८), सत्यवान आत्माराम गावडे (वय ३९) हे दोघे दुचाकीवरून सावंतवाडी ते ओरोस असे जात होते. मात्र ओरोस येथील उड्डाणपुलावर आल्‍यानंतर ओरोस मागे गेल्‍याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते कणकवलीच्या दिशेने जात होते. सकाळी अकराच्या दरम्‍यान महामार्गावरील वागदे डंगळवाडी येथे मांजर आडवे आल्‍याने दुचाकीस्वार सत्‍यवान याने ब्रेक मारला. यात दुचाकीवरील दोघे महामार्गावर कोसळले. अपघातानंतर एलसीबीच्या पथकातील हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, चालक रवी इंगळे यांनी तातडीने आपल्या शासकीय वाहनातून शुभांगी आणि सत्यवान यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. चौगुले यांनी दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार केले. या अपघातात शुभांगी यांच्या डोक्‍याला मार लागला. प्रथमदर्शनी कान आणि नाकातून रक्त येत होते. तर सत्यवान गावडे यांचा उजवा हात दुखापतग्रस्त झाला आहे. गावडे माय लेक हे ओरोस उड्डाणपुलावर आल्‍यानंतर ओरोस ऐवजी पुढे कणकवलीपर्यंत आले. येथे आल्‍यानंतर त्यांना ओरोस मागे राहिल्याचे लक्षात आले. त्‍यांनतर दुचाकी चालक सत्यवान आपल्या आईसह दुचाकीने पुन्हा ओरोसच्या दिशेने जात होते. द