
गवळदेव महोत्सवानिमित्त कुडाळला ५७ जणांचे रक्तदान गवळदेव महोत्सवानिमित्त कुडाळला ५७ जणांचे रक्तदान
71279
कुडाळ ः रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना प्रशांत राणे, महेश कुंभार, सचिन सावंत, गुरू धुरी, अंकुश कुंभार आदी.
गवळदेव महोत्सवानिमित्त
कुडाळला ५७ जणांचे रक्तदान
कुडाळ, ता. २७ ः श्री गवळदेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री गवळदेव मित्रमंडळ आणि उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित गवळदेव खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गवळदेव मित्रमंडळ आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कुडाळतर्फे रक्तदान शिबिर आणि रक्त गट तपासणी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये एकूण ५७ जणांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता.
येथील गवळदेव मंदिर नजीकच्या शिरसाट कंपाउंडमध्ये महोत्सव सुरू आहे. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष प्रशांत राणे, सचिव महेश कुंभार, उपाध्यक्ष सचिन सावंत, गुरू धुरी, अंकुश कुंभार, मनोज साळगावकर, राजा पडते, नंदकिशोर गावडे, विलास पावसकर, शिरसेकर, स्वरूप सावंत, केतन तेंडुलकर, विघ्नेश कुंभार, विनेष तिरोडकर, भाई म्हापणकर, रक्तपेढीच्या डॉ. प्राची तनपुरे, मयुरी शिंदे, टेक्निशियन अक्षय शेळके, परिचारक उल्हास राणे, नितीन गावकर व सुरेश डोंगरे, सिंधू रक्तमित्रचे प्रकाश तेंडुलकर, यशवंत गावडे, सचिन गुंड, विजय वारंग, नीता राणे, प्रज्ञा राणे, कविता जोशी, नेहा गावडे, रुपाली शिरसाट, सचिन कुंभार, शुभम राणे, किरण कुंभार, बबन कुंभार, संजू कुंभार, प्रल्हाद म्हाडदळकर आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी महेश कुंभार, गुरुनाथ धुरी, मनोज साळगावकर, भाई म्हापणकर यांनी मेहनत घेतली. महेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश कुंभार यांनी आभार मानले.