प्लास्टिकपासून साकारल्या आकर्षक कलाकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकपासून साकारल्या आकर्षक कलाकृती
प्लास्टिकपासून साकारल्या आकर्षक कलाकृती

प्लास्टिकपासून साकारल्या आकर्षक कलाकृती

sakal_logo
By

71283
सावंतवाडी ः येथील पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक बाटल्यांपासून बनविलेला रणगाड्यासमवेत लहान मुले.

प्लास्टिकपासून साकारल्या आकर्षक कलाकृती

सावंतवाडी पालिकेचा पुढाकार; स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी उपक्रम

सावंतवाडी, ता. २७ ः येथील पालिकेच्या माध्यमातून टाकाऊ प्लास्टिक, बाटल्या, पुठ्ठे आदी वस्तूंपासून शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. यात चक्क सोफासेट, शोभेच्या वस्तू आणि भला मोठा रणगाडा यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत नागरिकांना याची माहिती व्हावी, यासाठी या वस्तू सेल्फी पॉईंट म्हणून पालिकेच्या उद्यानात ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यात शहरात वारंवार कचरा टाकण्यात येणाऱ्या जागांवर या वस्तू ठेवल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी गार्डनचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
येथील पालिका स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच सतर्क राहिली असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असते. गेल्या वर्षी देखील अशाच टाकाऊ वस्तूंचा वापर करून बऱ्याच ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले होते. यावर्षी टायरचा वापर करून रणगाडा, सेल्फी पॉईंट आणि बसण्यासाठी खुर्च्या, टेबल यांसारख्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या वस्तू इनरव्हील महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यानात ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी या कलाकृतींनी अनेकांना भुरळ घातली. या कलाकृतीसोबत बऱ्याच जणांना सेल्फी घेण्याचा मोह टाळता आला नाही. मात्र, हा उपक्रम स्वच्छतेसाठी असल्यामुळे शहरात ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अशा परिसरात या कलाकृती बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून त्या ठिकाणी अस्वच्छता करताना नागरिक विचार करतील आणि नवा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.