फोटोसंक्षिप्त-गिर्येच्या ग्रा.पं. सदस्य मनस्वी गावकर भाजपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-गिर्येच्या ग्रा.पं. सदस्य 
मनस्वी गावकर भाजपात
फोटोसंक्षिप्त-गिर्येच्या ग्रा.पं. सदस्य मनस्वी गावकर भाजपात

फोटोसंक्षिप्त-गिर्येच्या ग्रा.पं. सदस्य मनस्वी गावकर भाजपात

sakal_logo
By

71286

फोटोसंक्षिप्त

टीपः swt274.jpg मध्ये फोटो आहे.

गिर्येच्या ग्रा.पं. सदस्य
मनस्वी गावकर भाजपात
देवगड ः तालुक्यातील गिर्ये ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या मनस्वी गावकर यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत सदस्या गावकर यांच्यासह मनोज गावकर व गणेश मंचेकर यांनी भाजपात प्रवेश केल्याची भाजपच्यावतीने देण्यात आली आहे. पक्षात त्यांचे स्वागत माजी आमदार अ‍ॅड. गोगटे यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, आरिफ बगदादी, संजय बोबडी, रुपेश गिरकर, विपुल आंबेरकर, नवनिर्वाचित सरपंच लता गिरकर, नवनिर्वाचित सदस्य सुशील मुंबरकर, संतोष गिरकर, दीपक पवार, गणेश घाटये, सुनील घाडी, सचिन गिरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

71287

विश्वनाथ सावंत यांना कोकणरत्न पुरस्कार
दोडामार्ग ः माजगाव (खाळचीआळी) गावचे सुपुत्र तथा एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा प्रशालेचे शिक्षक विश्वनाथ सावंत यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. नाईक हे 27 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय ते शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राबरोबरच संगीत, सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी दशावतार नाट्य परीक्षक, समूहसंगीत भजन स्पर्धांमध्ये परीक्षण केले आहे. अनेक विद्यार्थी देखील घडविले आहेत. या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते गिरीश परब यांनी अभिनंदन केले.