
‘जनसेवा’चे १ जानेवारीला बांद्यात पुरस्कार वितरण
71289
तेजस बांदिवडेकर, सुरेश गावडे, सुषमा केणी, दीप्ती प्रभू
‘जनसेवा’चे १ जानेवारीला
बांद्यात पुरस्कार वितरण
बांदा, ता. २७ ः जनसेवा निधी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे पत्रकार शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा वजराट नंबर १, (ता. वेंगुर्ले) प्रशाळेचे शिक्षक तेजस बांदिवडेकर, आदर्श माध्यमिक शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे प्रशाळेच्या शिक्षिका दीप्ती प्रभू, आदर्श समाजसेविका पुरस्कार सुषमा केणी (कणकवली), आदर्श मुख्याध्यापक (माध्यमिक शाळा) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, आंबोलीचे प्राचार्य सुरेश गावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत बांदा केंद्रात इंग्रजी विषयात प्रथम आलेली रिद्धी तळेगावकर, प्रणाली असनकर, मराठी विषयात प्रथम आलेला हर्ष शिरोडकर, प्रणव नाईक, विज्ञान विषयात पहिली आलेली रिद्धी तळेगावकर, गणित विषयात पहिला आलेला संकेत देसाई, बारावी परीक्षेत बांदा केंद्रात प्रथम आलेली प्राजक्ता डुगल या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद खानोलकर यांनी केले आहे.