आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा
आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा

आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा

sakal_logo
By

71278
वेंगुर्ले ः इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेतील विजेती लक्ष्मी प्रभुखानोलकर हिला मान्यवरांच्या हस्ते फिरती ढाल देऊन गौरविण्यात आले.

आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा

डॉ. श्रीपाद गिरसागर ः वेंगुर्लेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिनी अभिवादन

वेंगुर्ले, ता. २७ ः तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. त्यांनी विचार करत बसू नये, तर विचार करून आचरण करावे. कोणतीही गोष्ट नाकारू नका. नाराज होऊ नका, आव्हानांना धैर्याने समोरे जाऊन यश मिळवा. आदर्श मिळणे कठीण असले तरी समाजात आजही काही आदर्श आहेत. बॅ. खर्डेकरांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे आवाहन मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मेजर डॉ. श्रीपाद गिरसागर यांनी केले.
येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात काल (ता. २६) बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचा ५९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. गिरसागर बोलत होते. या देशाचे वैभव स्त्रियांनी आणि मुलींनी टिकवले आहे. मुली सहनशील असतात, असे सांगून गुरुवर निष्ठा ठेवून जीवन यशस्वी करा. बॅ. खर्डेकर हे उत्कृष्ठ खेळाडू होते. त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवा, निर्भयता, सौंदर्यदृष्टी या गुणांचा अंगिकार विद्यार्थ्यांनी करावा, असेही डॉ. गिरसागर यांनी आवाहन केले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, बॅ. खर्डेकर स्मृतिदिन समितीचे चेअमरन प्रा. सदाशिव भेंडवडे, ‘कलावलय’चे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, बी.के.सी. असोसिएशनचे सतीश डुबळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद बांदेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बॅ. खर्डेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बॅ. खर्डेकर हे दातृत्ववान होते. त्यांनी आपल्याला मिळालेली चषक, चांदीची पदके विकून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली. तसेच ते स्त्रियांचाही सन्मान करत असल्याची माहिती प्राचार्य देऊलकर यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्यपदी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक हेमंत गावडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवाज्येष्ठ शिक्षक बी. बी. जाधव आणि सेवा ज्येष्ठ कर्मचारी बोलेकर यांचाही सन्मान करण्यात आला. (कै.) प्रा. उदयराव देसाई यांच्या स्मरणार्थ माधुरी देसाई व प्रणव देसाई यांच्याकडून महाविद्यालयास पाच हजारांची देणगी देण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, अॅड. गिरसागर, एम. आर. देसाई, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, अरविंद आळवे, वामन धुरी, चंद्रशेखर माडकर, महादेव करंगळे, अशोक सावळे, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रा. भेंडवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एम. बी. चौगले यांनी परिचय केला. संपदा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बांदेकर यांनी आभार मानले.
--
स्पर्धा आणि सन्मान सोहळा
इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत वीस विद्यार्थी सहभागी झाले. यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या लक्ष्मी प्रभुखानोलकर हिला फिरती ढाल देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सानिका मांजरेकर, तृतीय यशोदा परब व सानिया वराडकर, उत्तेजनार्थ फाल्गुनी नार्वेकर यांना गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठामार्फत गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त (ग्रामीण विभाग) संजय पाटील, कोकणरत्न पुरस्कार विजेते प्रा. दिलीप शितोळे, प्रा. वसंत नंदगिरीकर, प्रा. अरविंद बिराजदार आदींचा सन्मान करण्यात आला.