‘मन की बात’ कार्यक्रमास ख्रिस्ती बांधवांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मन की बात’ कार्यक्रमास
ख्रिस्ती बांधवांचा प्रतिसाद
‘मन की बात’ कार्यक्रमास ख्रिस्ती बांधवांचा प्रतिसाद

‘मन की बात’ कार्यक्रमास ख्रिस्ती बांधवांचा प्रतिसाद

sakal_logo
By

71291
वेंगुर्ले ः परबवाडा येथील ख्रिस्ती बांधवांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम पाहिला. यावेळी उपस्थित भाजपचे पदाधिकारी.


‘मन की बात’ कार्यक्रमास
ख्रिस्ती बांधवांचा प्रतिसाद
वेंगुर्ले, ता. २७ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ख्रिसमसनिमित्त तालुक्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील ख्रिस्ती बांधवांसोबत पाहण्याचे आयोजन केले होते. याला बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी आपल्या बुथवर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात; परंतु, यावेळी हा कार्यक्रम नाताळनिमित्त परबवाडा येथील ख्रिस्ती बांधवांसोबत पहाण्याचे नियोजन भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे केले होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व भाजप पदाधिकाऱ्यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, परबवाडा सरपंच पप्पू परब, पंच सदस्य संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, बुथ प्रमुख संजय मळगावकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा सावंत, युवा मोर्चाचे तुषार साळगावकर, सचिन सावंत, निलेश मांजरेकर, मयुरेश परब, अक्षय परब, नीलेश मांजरेकर, सायमन आल्मेडा, इनसीन फर्नांडिस, दुवाट फर्नांडिस, शिरीन आल्मेडा, सायेर आल्मेडा, पास्कु आल्मेडा, स्टीवन आल्मेडा, सुलोरीन डीसोजा, सोफिया डीसोजा, फियाद फर्नांडिस, ग्लानेस फर्नांडिस, कोव्हेल फर्नांडिस, लविना फर्नांडिस, लिबेरीन फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस, अँना डीसोजा, घरपीर डीसोजा, येतान फर्नांडिस, निसलस फर्नांडिस आदी उपस्थित होते.