
प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांनी सादर केली कला
rat27p3.jpg-
71254
रत्नागिरीः रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना अॅड. संकेत घाग आणि दीप्ती आगाशे. सोबत समन्वयक डॉ. आनंद आंबेकर.
---------
विविध कलाप्रदर्शनांमधून
विद्यार्थ्यांचे सादरीकरण
रत्नागिरी, ता. २७ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा झेप सांस्कृतिक महोत्सव तरुणाईच्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. या महोत्सवात सांस्कृतिक कलागुणांबरोबर शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विभागांच्यावतीने विविध विषयांना स्पर्श करणारे आणि त्या विषयातील ज्ञान उलगडून दाखवणाऱ्या माहितीपर प्रदर्शनांचे आयोजन केले. या प्रदर्शनांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने माहिती तंत्रज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन या विषयावरील प्रदर्शनाचे भरवले. कलाप्रकारांचे दर्शन घडवणारी अनेक कलाप्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पर्यावरण प्रश्न, सामाजिक प्रश्न, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष अशा विविध संकल्पना समोर ठेवून विद्यार्थ्यांनी रांगोळी, ऑन दी स्पॉट पेंटिंग, फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, मेहंदी अशा कलेतून कौशल्य दाखवले. रांगोळी प्रदर्शनही आकर्षण ठरले. लॅन गेमिंग, गेमहाऊस, फनीगेम्सचेही आयोजन केले.
महाविद्यालयातील फिल्म क्लबच्यावतीने सिनेमावर आधारित प्रश्नमंजूषा, वादविवाद आणि वक्तृत्व समितीच्यावतीने वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, समूहचर्चा, कुकिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रदर्शनांना र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
चौकट
वनस्पती- प्राणीशास्त्र विभागांचे अनोखे प्रदर्शन
जगातील सर्वात मोठे फूल, धबधबा, बुरशीचे विविध प्रकार, विविध झाडे यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. प्राणीशास्त्र विभागाने विस्मयकारी गंमतीजमती या मुख्य विषयांतर्गत मानवी शरीरातील विविध अवयवांचे प्रदर्शन, जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवी जीवनाचे विविध टप्पे, राष्ट्रीय उद्याने अशा अनेकविध प्रतिकृती उभारल्या होत्या. विद्यार्थी व निमंत्रितानी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शने यशस्वी केली.