गावतळे-भडवळे रस्त्याचे खड्डे बुजवण्यास सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावतळे-भडवळे रस्त्याचे खड्डे बुजवण्यास सुरवात
गावतळे-भडवळे रस्त्याचे खड्डे बुजवण्यास सुरवात

गावतळे-भडवळे रस्त्याचे खड्डे बुजवण्यास सुरवात

sakal_logo
By

rat२७p१८.jpg
७१३१२
गावतळेः भडवळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आलेले मशनरी, शेजारी रस्त्यावरील बुजवलेले खड्डे. (छायाचित्रः अशोक चव्हाण, गावतळे)
------------
गावतळे-भडवळे रस्त्याची डागडुजी

ग्रामस्थांमधून समाधान; १६ कोटीच्या रस्त्यावर दरवर्षी पडतात खड्डे
गावतळे, ता. २८ ः तब्बल १६ कोटी इतका खर्च करून तयार करण्यात आलेल्या गावतळे-भडवळे या रस्त्यावर दरवर्षी मोठमोठे खड्डे पडत आहेत. हे खड्डे बुजवावेत म्हणून दरवर्षी येथील ग्रामस्थ आणि वाहनचालक मागणी करत असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी विषय लावून धरला. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात झाली आहे.

गावतळे-भडवळे असा १६ किलोमीटर अंतर रस्ता तयार केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तर या रस्त्यासाठी १६ कोटी इतका निधी खर्च झाला आहे. अजून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही ठेकेदार कंपनीकडे आहे; मात्र रस्ता तयार करताना या रस्त्यावर योग्य पद्धतीने काम झाले नाही म्हणून रस्ता वारंवार उखडत आहे, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी कामाचा दर्जा राखण्यात आला नाही, असा आक्षेप नागरिक नोंदवत आहेत. अनेक ठिकाणी या रस्तेमोरी कामाला ग्रीड वापरण्यात आला आहे. याबाबत सुरवातीलाच नागरिकांनी ही बाब ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिली होती; मात्र तरीही दुर्लक्ष केले गेले आहे. या रस्त्याची पाहणी करणारे अधिकारी कोण? ठेकेदार कोण याबाबतची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे या रस्त्याची कैफियत मांडायची कुणाकडे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. दरवेळेस या रस्त्यावर महाकाय खड्डे पडतात आणि बातमी प्रसिद्ध झाली की, त्यानंतर संबंधित यंत्रणा या रस्त्यावर मलमपट्टी करत आहे. त्यानंतर चार महिने गेले की, पुन्हा खड्डे असा खेळ सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे वाहनचालक हैराण झाले आहेत तर या मार्गावरील खड्ड्यांबाबत कायमचा मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.