राजापूर-आकाश गोसावी, रुचिता पांचाळ आदर्श स्वयंसेवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-आकाश गोसावी, रुचिता पांचाळ आदर्श स्वयंसेवक
राजापूर-आकाश गोसावी, रुचिता पांचाळ आदर्श स्वयंसेवक

राजापूर-आकाश गोसावी, रुचिता पांचाळ आदर्श स्वयंसेवक

sakal_logo
By

rat२७p२३.jpg
७१३२३
राजापूरः श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना संस्था सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत.
---------
आकाश गोसावी, रुचिता पांचाळ आदर्श स्वयंसेवक
खापणे महाविद्यालयाचे शिबिर ; विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून कामे
राजापूर, ता. २७ः रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराची सांगता नुकतीच झाली. यामध्ये आदर्श स्वयंसेवक म्हणून आकाश गोसावी, तर आदर्श स्वयंसेविका म्हणून रूचिता पांचाळ हिला गौरविण्यात आले. बेस्ट डायरी लेखनाचा पुरस्कार तनुजा पाटेकर हिला देण्यात आला.
तालुक्यातील रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच झाले. समारोपाला संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, उपसरपंच संजीवनी कारेकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश चांदे, ज्येष्ठ नागरिक जनार्दन गांगण, खापणे महाविद्यालयाचे मुख्य लिपिक नरेश पाचलकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. मुग्धा देवरूखकर आदी उपस्थित होते. रायपाटण येथे सात दिवस झालेल्या या निवासी शिबिरामध्ये २० शोषखड्डे खोदाई, अर्जुना नदीवर बंधारा, ग्रामीण रुग्णालय रायपाटण स्वच्छता, श्री संगनाथेश्‍वर मंदिर, ग्रामपंचायत परिसर, श्री राममंदिर, श्री दत्तमंदिर, होळीचा मांड आणि बसस्थानक परिसर स्वच्छता यांसह अन्य विद्यार्थ्यांनी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती डॉ. पाटील यांनी या वेळी दिली.
शिबिरामध्ये ग्रुप नं. १ ला बेस्ट ग्रुप, बेस्ट श्रमदान म्हणून ग्रुप नं. २ ला, ग्रुप नं. ३ ला विशेष नियोजन, ग्रुप नं. ४ ला विशेष भोजन तर ग्रुप नं. ५ ला सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रुप नं. ६ ला उत्कृष्ट नियोजन पुरस्काराने गौरवण्यात आले.