
मंडणगड-संक्षिप्त पट्टा
शिक्षक संघाच्या दापोली शाखेची सभा
गावतळेः अखिल प्राथमिक शिक्षक संघाच्या दापोली शाखेच्या कार्यकारिणीची सभा दापोलीला झाली. सदर सभेमध्ये शिक्षकांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच नासा/इस्रो भेटीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून तालुक्यातील संबंधित विद्यार्थ्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले. अखिल टीचर प्रीमियर लीग २०२३ चे नियोजन करून गतवर्षीप्रमाणे समित्या कायम करण्यात आल्या. अशोक मळेकर यांनी प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये आणि चषक देण्याचे जाहीर केले. यावर्षी प्रथमच सभासदांच्या आग्रहास्तव संघटनेची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष रमाकांत शिगवण, जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, उपाध्यक्ष संभाजी सावंत, तालुकाध्यक्ष विजय फंड, सल्लागार सुनील कारखेले, विलास मालगुंडकर, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
-----
-ratchl२६१.jpg-
71358
चिपळूण ः यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक.
----------
कथाकथनमध्ये सती विद्यालयाची बाजी
चिपळूण ः चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुकास्तरीय कथाकथन व वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. कथाकथन स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात साक्षी शिंदेने प्रथम, माध्यमिक गटात साईदास राजेशिर्केने द्वितीय, प्राथमिक गटात मृण्मयी जोगने द्वितीय, वक्तृत्व स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात स्नेहा संतोष शिंदेने प्रथम, माध्यमिक गटात अथर्वी चव्हाणने तृतीय, प्राथमिक गटात मृण्मयी जोगने द्वितीय क्रमांक मिळवला. साक्षी शिंदे हिची कथाकथन स्पर्धेसाठी, तर स्नेहा शिंदेची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.