पांचाळ-सुतार समाज मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांचाळ-सुतार समाज मेळावा
पांचाळ-सुतार समाज मेळावा

पांचाळ-सुतार समाज मेळावा

sakal_logo
By

पांचाळ-सुतार
समाज मेळावा
रत्नागिरीः जिल्हा पांचाळ-सुतार समाज संघातर्फे 7 व 8 जानेवारीला समाज जोडो अभियांतर्गत जिल्हा मेळावा चिपळुणातील बांदल हायस्कूलमध्ये होणार आहे. या वेळी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी, डीग्री इंजिनिअर्स एमइ, एमटेक्, पीएचडी पास विद्यार्थी, सर्व प्रकारचे डॉक्टर्स, सनद मिळाले वकील यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून दोन व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन दिवस कलादालन प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये चित्रे, रांगोळी, मॉडेल या विभागात मांडणी करण्यात येणार आहे. समाजातील ज्या बांधवांना प्रदर्शनात भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे कमिटीकडे द्यावीत. मेळाव्यात विशेष मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष विश्वकर्मा वंशिय समाज संघटक महाराष्ट्र प्रा. नागोजीराव पांचाळ, श्री विश्वकर्मा पुराण अभ्यासक, आचार्य मच्छिंद्रनाथ चारी, संघटनात्मक मार्गदर्शक कृष्णकुमार काणेकर आदी उपस्थित रहाणार आहेत.
----
सेवानिवृत्तांची
वार्षिक सभा
साडवली ः संगमेश्वर तालुका सेवानिवृत्तांची जनसेवा समिती देवरूखची 12वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. 30) सकाळी 10.30 वा. खालची आळी येथील कार्यालयात होणार आहे. सभेला सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश घस्ते यांनी केले आहे.
-----------
समर्थ स्कूलमध्ये
सांस्कृतिक कार्यक्रम
खेड ः वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 29 आणि 30 डिसेंबरला विश्‍व भरारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उद्योजक मंगेश बुटाला, पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगावकर, संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉ. अली, पर्यवेशक्षक घोसाळकर, निकी मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी सर्वम शिरोडकर, वैष्णवी घोसाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
--