शिरगाव, गणपतीपुळे भागात वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव, गणपतीपुळे भागात वाहतूककोंडी
शिरगाव, गणपतीपुळे भागात वाहतूककोंडी

शिरगाव, गणपतीपुळे भागात वाहतूककोंडी

sakal_logo
By

rat27p24.jpg-
L71324
गणपतीपुळेः मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे झालेली वाहतूक कोंडी.
-rat27p25.jpg-
71325
शिरगावः रत्नागिरी शहरातून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी.
----------
शिरगाव, गणपतीपुळेत वाहतूककोंडी
पर्यटकांची गर्दी; वर्दळ वाढल्याने नागरिकांसह पर्यटकही हैराण
रत्नागिरी, ता. २७ः नाताळ व नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत. आकर्षक समुद्रकिनाऱ्यांवर या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असणाऱ्या गणपतीपुळे येथेही गर्दीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ वाढली असून आज रत्नागिरी शहरानजीक शिरगाव येथे वाहतूककोंडीचा सामना पर्यटक व सामान्य नागरिकांना करावा लागला. बराच वेळ ही कोंडी झाल्याचे पर्यटकांनी सांगितले.
प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर शिरगाव येथे बऱ्याचदा वाहतूककोंडी होते. या मार्गाला बायपास मार्ग अद्याप झालेला नाही. या रस्त्याचे गेल्या वर्षी काँक्रिटीकरण केले आहे. रस्ता थोडा फार अरूंदच आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडीचा त्रास पर्यटकांसह नियमित येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणाकडे येऊ लागले आहेत आहेत. स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य ठिकाण असलेल्या गणपतीपुळ्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. शिवाय जवळचा मार्ग म्हणजे शिरगाव मार्गे आरे-वारे, काजीरभाटीमार्गे गणपतीपुळे. या प्रवासाला साधारण पाऊण तास लागतो; परंतु सध्या रस्त्यावर वाहने वाढल्याने पर्यटक धिम्या गतीने वाहने हाकत आहेत. मोठ्या खासगी गाड्या येत असल्याने शिरगाव भागात वाहतूककोंडी होत आहे. पर्यायी मार्ग त्वरित काढण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.