विद्यार्थी, पालकांनी घेतले ‘आकाशदर्शन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी, पालकांनी घेतले ‘आकाशदर्शन’
विद्यार्थी, पालकांनी घेतले ‘आकाशदर्शन’

विद्यार्थी, पालकांनी घेतले ‘आकाशदर्शन’

sakal_logo
By

71359
ओटवणे ः आकाश दर्शनाचा आनंद लुटताना विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक.

विद्यार्थी, पालकांनी घेतले ‘आकाशदर्शन’

‘सिंधुमित्र’चा पुढाकार; सावंतवाडीसह माजगाव, ओटवणेत उपक्रम

ओटवणे, ता. २७ ः येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर, माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय आणि येथील जिमखाना लाखे वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘आकाशदर्शन’ या आगळावेगळ्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील अभियंता तथा खगोलशास्त्र अभ्यासक मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनासाठी झालेल्या या आकाश दर्शनाचा विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला.
भूगोलाच्या पुस्तकात अवकाश दर्शनाचे महत्त्व सांगिलेले जाते. ग्रह व त्यांचे उपग्रह, तारे, तारका समूह, धुमकेतू आदींची माहितीही या अभ्यासक्रमात आहे; मात्र पुस्तकातील लिखाणाच्या व चित्रांच्या आधारे आकाश समजून घेणे व प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने आकाशाचे अवलोकन करणे, यात मोठा फरक आहे. प्रत्यक्ष आकाश दर्शनाने विद्यार्थ्यांच्या खगोलशास्त्राच्या रुचीसह त्यांची जिज्ञासा वाढते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने ‘आकाशदर्शन’ या माहिती प्रधान व प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन २४ ते २६ असे तीन दिवस सायंकाळी ६ ते रात्री ११.३० पर्यंत करण्यात आले होते. यावेळी मंदार माईणकर यांनी ग्रह व त्यांचे उपग्रह, नक्षत्र, राशी, तारका समूह, धूमकेतू, प्रकाश वर्ष, विविध प्रकारच्या दुर्बिणी याबाबत पावरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच पालकांना माहिती दिली. नासा व इतर अंतराळ स्थानकांनी अवकाशातून घेतलेल्या चित्रांच्या माध्यमातूनही त्यांनी आकाश समजावून सांगितले. दिवस-रात्र व ऋतू कसे होतात? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शब्दगंध, एक दिवस शाळा भेट, सायकल वाटप, स्कूल कीट वाटप आदी शैक्षणिक विविधांगी उपक्रम राबविले जातात. यावेळी सिंधुमित्रचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे, सीए लक्ष्मण नाईक, दीपक गावकर, प्रकाश पाटील, रवी जाधव, सिध्देश मणेरीकर, भार्गवराम शिरोडकर, नीलेश माणगावकर तसेच दोन्ही प्रशालेतील मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते.
.............
ग्रह, उपग्रहांचे दुर्बिणीतून दर्शन
यावेळी माईणकर यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून शनी, गुरु, मंगळ व मंगळाच्या उपग्रहांचे दर्शन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांना करून दिले. शिवाय आकाशाचा अभ्यास प्रत्यक्ष कसा करावा? आकाशाच्या सीमा कशा ओळखाव्यात? रात्रीच्या वेळी दिशादर्शन कसे करावे? ही सर्व माहिती त्यांनी समजावून सांगितली. सिंधुमित्रच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षकांनी कौतुक केले.