
फोटोसंक्षिप्त-अनुष्का कदमांना ''आदर्श'' पुरस्कार
७१३७६
फोटोसंक्षिप्त
टीपः swt२७३०.jpg मध्ये फोटो आहे.
अनुष्का कदमांना
''आदर्श'' पुरस्कार
मालवण : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका अनुष्का कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. कदम या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवित असतात. इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना दरवर्षी राज्यस्तरावर नवोपक्रम सादर करतात. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. शैक्षणिक लेख, निबंध लेखन करत असतात. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालक, अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
L७१३८३
swt२७३१.jpg मध्ये फोटो आहे.
आचरा किनारी स्वच्छता मोहीम
आचरा ः सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. यामुळे प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आचरा ग्रामपंचायतीतर्फे येथील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सरपंच प्रणय टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आचरा परिसरातील शाळांचे विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी पी. जी. कदम, विस्तार अधिकारी राजेंद्र कांबळे, सीआरपी गायत्री वाडेकर, यशराज प्रेरणा ग्रुपचे मंदार सरजोशी, समीर आचरेकर, धनश्री आचरेकर, संघ अध्यक्ष नंदिनी पांगे, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी तसेच केंद्र शाळा आचरे नंबर १, पिरवाडी, उर्दू शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, इंग्लिश मीडियम या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.