सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्षपदी मेघनाद धुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी 
संस्थाध्यक्षपदी मेघनाद धुरी
सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्षपदी मेघनाद धुरी

सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्षपदी मेघनाद धुरी

sakal_logo
By

मेघनाद धुरी फोटो येईल


सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी
संस्थाध्यक्षपदी मेघनाद धुरी

बिनविरोध निवड; उपाध्यक्षपदी वेंगुर्लेकर

मालवण, ता. २७ : सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था लिमिटेड, मालवणच्या अध्यक्षपदी मेघनाद धुरी, तर उपाध्यक्षपदी विलास वेंगुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले.
सिंधुदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. यात संचालक संतोष खोबरेकर, अमर टिकम, विलास वेंगुर्लेकर, ज्ञानदेव वेंगुर्लेकर, लीलाधर शेलटकर, विल्सन फर्नांडीस, मनोज मेथर, रोहित मेथर (सर्व धुरीवाडा सर्वसाधारण क्रियाशील सभासद), विमल वेंगुर्लेकर, विजया मेथर (महिला प्रतिनिधी), मेघनाद धुरी (भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग) हे निवडून आले होते. संस्था कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी मेघनाद धुरी यांनी अर्ज सादर केला. त्यांना सूचक म्हणून ज्ञानदेव वेंगुर्लेकर, तर अनुमोदक म्हणून रोहित मेथर होते. उपाध्यक्षपदासाठी विलास वेंगुर्लेकर यांनी अर्ज सादर केला. त्यांना सूचक म्हणून मनोज मेथर, तर अनुमोदक म्हणून विल्सन फर्नांडीस होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी दोनच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हिर्लेकर यांनी निवड बिनविरोध जाहीर केली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. यावेळी भाई कासवकर आदी उपस्थित होते.