रत्नागिरी-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

sakal_logo
By

rat२७१५. txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

व्यसनमुक्ती केंद्राचा शनिवारपासून वर्धापनदिन

रत्नागिरी ः शहराजवळील चाँदसूर्याचा मोडा-खेडशी येथील प. पू स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच्या व्यसनमुक्ती सेवाकेंद्राच्या वास्तूचा २२ वा वर्धापनदिन सोहळा येत्या शनिवार ते २ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री १२ वा. अनुष्ठान प्रारंभ, सकाळी १० ते ११.३० या वेळेत हळदीकुंकू. १ जानेवारीला सायं. ५.३० ला काकड आरती, सकाळी ९ वा. आरती, अनुष्ठान समाप्ती, १० ते ११.३० भजन, दुपारी १ वा. सूर्यदर्शन, १२ वा. आरती, ३ वा. सभा व व्यसनमुक्तांचा सत्कार, १ ते ५.३० भजन, पाच ते सहा या वेळेत महाप्रसाद. सायं. ६ वा. आरती, ७ वा. अग्नीहोम, ७ ते रात्री ८.३० या वेळेत आध्यात्मिक सेवाकेंद्रात मिरवणूक, रात्री ९ वा. आरती व १० ते १२ या वेळी स्वामींचे दर्शन, १२ वा. आरती व भजन. २ला सकाळी ५.३० वा. काकड आरती. वर्धापनदिनानिमित्त सेवाकेंद्रात बाळ सत्यधारी महाराज हे विश्वातील कोरोनाचा प्रादुर्भाव व या वर्षी चालू झालेल्या ओमायक्रॉन हा विषाणू नष्ट होण्यासाठी तीन दिवसांच्या कालावधीत अनुष्ठान कार्यक्रमाच्या निमित्ताने निसर्गाला साकडे घालणार आहेत. हा निसर्ग रोग जाईपर्यंत प्रार्थना अखंड चालू राहणार आहे. २ जानेवारीला दुपारी ३ वा. व्यसनमुक्ती सेवाकेंद्र येथे सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण

रत्नागिरी ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि मत्स्य महाविद्यालयातर्फे बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रम मत्स्य महाविद्यालयात झाला. मत्स्य महाविद्यालयातील १५० आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिला संगणक महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थिनी असे एकूण २०० पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘मानिकेंस’द्वारे कृत्रिम श्वासोच्छवासचे (सीपीआर) प्रशिक्षण प्राप्त केले. बेसिक लाइफ सपोर्ट हा रोटरीचा अत्यंत महत्वाचा असा प्रकल्प असून, प्रत्येक नागरिकास सीपीआरचे ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण आवश्यक आहे. एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचे अथवा बालकाचे हृदय बंद पडले, श्वास घेता येत नसेल तर पुढील योग्य वैद्यकीय उपचार मिळेपर्यत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी काय करावे याची शास्त्रोक्त माहिती असणे प्रत्येक व्यक्तीला गरजेचे असते. प्रतिकूल परिस्थितीत योग्य शास्त्रोक्त उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने उपचार कसा करावा याचे प्रशिक्षण बेळगाव येथील ई-रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश फडणीस (एमडी मेडिसिन) आणि अनंत नांदगौडा यांनी विद्यार्थी आणि अध्यापक यांना प्रशिक्षण दिले. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. त्या वेळी रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा अॅड. शाल्मली आंबुलकर आणि रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष राजेंद घाग, रोटरी परिवारातील सदस्य, महिला संगणक महाविद्यालय शिरगावचे प्राध्यापक उपस्थित होते.
---
फोटो ओळी
-rat२७p१४.jpg ः
७१३०५
लांजा ः शिरवली शाळेच्या आशिष गोबरे याचा सत्कार करताना गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी.
---
इस्त्रो भेट निवडबाबत आशिष गोबरेचा सत्कार

लांजा ः नासा व इस्रो भेट निवड चाचणी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून अंतराळ संशोधन संस्था अमेरिकेतील नासा व बंगळुरू येथील इस्रो या दोन्ही संस्थांना भेट देण्यासाठी लांजा तालुक्यातून एकमेव निवड झालेल्या शिरवली शाळेच्या आशिष गोबरे याचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले. आशिषने केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हास्तरावर झालेल्या प्रत्येक टप्प्यावरील परीक्षेत अव्वल स्थान कायम राखले. गटविकास अधिकारी यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर, विस्तार अधिकारी विनोद सावंग, प्रकाश कांबळे, केंद्रीय प्रमुख पर्शुराम मासये यांनी भेट देत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या शाळेचे केंद्रस्तरावर १० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर प्रभाग स्तरावर ७ विद्यार्थ्यांची तर तालुकास्तरावर २ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
---

फोटो ओळी
-rat२७p२८.jpg ः
७१३३७
साखरपा ः सतीमाता मंदिर
---
साखरपा-जाधववाडीत रंगणार सतीमाता उत्सव

साखरपा ः मागील दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेला जाधववाडी येथील सतीमाता उत्सव जानेवारी महिन्यात होणार आहे. हा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यासाठी जाधववाडीमधील लहानथोर मंडळी उत्सवाच्या तयारीत मग्न आहेत. उत्सवाचा प्रारंभ ४ जानेवारीला सायं. ६ वा. देवाला रूपे लावून होणार आहे. यानंतर रात्री ८ वा. पालखी नाचवणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री १० वा. प्रसिद्ध असलेल्या झिमनबुवा यांचे नमन कार्यक्रम होणार आहे. ५ जानेवारी या यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ११ वा. जाधववाडी ते सतीमाता मंदिर मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दिवसभर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री ९ वा. भक्तांच्या उपस्थितीत पालखी नाचवली जाते. रात्री कोल्हापूर येथील प्रसिद्ध असलेला सुतारबंधू यांचा झंकार ऑर्केस्ट्रा होणार आहे. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाची पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आयोजक जाधववाडीच्यावतीने सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---
फोटो ओळी
-rat२७p२९.jpg ः
७१३३८
आंबडवे ः आविष्कार रिसर्च कन्वेन्शन २०२२मध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक.
---
हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल प्रकल्पाची निवड

मंडणगड ः मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन आविष्कार रिसर्च कन्वेन्शन २०२२च्या रत्नागिरी विभागाचे प्रदर्शन लांजा महाविद्यालयात झाले. प्रदर्शनात विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे ज्ञानेश्वर जगदाळे व प्रसाद घाणेकर या एफवायआयटीच्या विद्यार्थ्यांनी ''ग्रीन कम्प्युटिंग फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट'' या विषयावर तर गौरव जाधव, अवधूत केळसकर व यश चव्हाण या टीवायआयटीच्या विद्यार्थ्यांनी ''हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल'' या विषयावर आपले प्रदर्शन सादर केले. यापैकी ''हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल'' या संशोधन प्रकल्पाची निवड प्रथम फेरीमध्ये झाली आहे. सहायक प्रा. राजेंद्र राऊत यांनी रिसर्च समन्वयक व सहायक प्रा.अरुण ढंग यांनी मार्गदर्शक म्हणून आणि वैज्ञानिक हसमुख सपनावाला यांनी प्रकल्प संकल्पना विकासात विशेष मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर, संचालक डॉ. किशोर सुखटणकर व सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य मिळाले.
---