रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

rat२७p३९.jpg-
७१३९९
सदानंद कुलकर्णी, किशोर चांदे, शिवराज कदम, अंतरा रहाटे
---------
कुलकर्णी, चांदेंना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
एक जानेवारीला वितरण ; अंतरा रहाटे, शिवराज कदमांचाही गौरव

जिल्हा ग्रंथालय संघ---लोगो

रत्नागिरी, ता. २७ ः रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाने वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या ग्रंथालय चळवळीमधील कार्यकर्त्यांना व आदर्श ग्रंथालय सेवक हा पुरस्कार ग्रंथालय चळवळीतील कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येते.
२०२२-२३ या वर्षामध्ये ग्रामीण ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचक निर्माण करण्यासाठी, घरोघरी ग्रंथसंपदा पोहोचवण्यासाठी पराकष्ट घेणाऱ्या श्री दत्त ग्रंथालयाचे (लवेल, ता. खेड) संचालक सदानंद वसंत कुलकर्णी व ज्ञानदीप वाचनालयाचे (कसबा, ता. संगमेश्वर) संचालक किशोर देवजी चांदे यांना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
ग्रंथालयाच्या ग्रंथसंपदेमध्ये वाढ करून वाचकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या स्व. आम. सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अंतरा रहाटे आणि पंचक्रोशी जीवनबोध सार्वजनिक वाचनालयाचे (जामगे, ता. दापोली) ग्रंथपाल शिवराज कदम ग्रंथपाल यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या विजेत्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्राने रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या १ जानेवारी २०२३ ला ज्ञानदीप वाचनालयात होणाऱ्या अधिवेशनामध्ये गौरवण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त कार्यकर्ते व सेवकांचे अभिनंदन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट, उपाध्यक्ष संभाजी सावंत, प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे, कोषाध्यक्ष गजानन कालेकर, सहकार्यवाह महेंद्र दळवी यांनी अभिनंदन केले.