अभूतपूर्व उत्साहात ठाण्याचा समीर गायकवाड ठरला महाराष्ट्र श्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभूतपूर्व उत्साहात ठाण्याचा समीर गायकवाड ठरला महाराष्ट्र श्री
अभूतपूर्व उत्साहात ठाण्याचा समीर गायकवाड ठरला महाराष्ट्र श्री

अभूतपूर्व उत्साहात ठाण्याचा समीर गायकवाड ठरला महाराष्ट्र श्री

sakal_logo
By

rat२७p३४.jpg
७१३४९
रत्नागिरीः शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांसह जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, क्रीडा अधिकारी श्री. बोराडे यांच्यासह आयोजक प्रशांत पवार, राजेश शेळके, आनंद तापेकर, जान्हवी पाटील, जमिर खलपे, प्रणील पाटील, मुस्ताक खान, जोशी, फैय्याज खतिब, संतोष कदम, जाधव आदी.
-----
ठाण्याचा समीर गायकवाड महाराष्ट्र श्री
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ; ईश्वर ढोलम महाराष्ट्र किशोर, अजिंक्य पवार झाला महाराष्ट्र उदय
रत्नागिरी, ता. २७ः रत्नागिरीकरांच्या उपस्थितीने पूर्णतः भरलेले नाट्यगृह... प्रत्येक स्पर्धकाला उत्साहपूर्ण मिळणारा पाठिंबा... आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा... अगदी जोशात झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या समीर गायकवाड याने हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत मानाचा ''महाराष्ट्र श्री'' हा किताब पटकावला.
स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्याकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७२ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात झाली. २५ आणि २६ डिसेंबर असे दोन दिवस स्पर्धा झाली. ६ गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील ३५० स्पर्धक सहभागी झाले. प्रत्येक गटातील स्पर्धा अत्यंत रोमांचकारी झाली.
स्पर्धेतील अत्यंत मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र श्री हा किताब ठाण्याच्या समीर संजय गायकवाड याने पटकावला. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत गायकवाड विजयी ठरला. त्याला रोख ५१ रुपये हजार आणि मानाची ट्रॉफी देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र किशोर हा किताब ईश्वर प्रदीप ढोलम याने, महाराष्ट्र उदय हा किताब अजिंक्य पवार याने पटकावला. महाराष्ट्र श्रीमान हा किताब स्वप्नील सुरेश वाघमारे याने पटकावला. महाराष्ट्र फिटनेस हा किताब विश्वनाथ पुजारी तर महाराष्ट्र कुमार हा किताब जगन्नाथ जाधव याने पटकावला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम २१ हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.